लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेने यजमान इंग्लडचा २० धावांनी पराभव केला. यानंतर दिग्गज सचिन तेंडूलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण आणि विरेंद्र सेहवाग यांनी लंकेच्या खेळाडूचे कौतूक केले. यानंतर चर्चा रंगली आहे ती इंग्लिश चाहत्यांची. होय, यॉर्कशायरच्या चाहत्यांनी सामन्यात आपला इंग्लड देश सोडून श्रीलंकेला 'सपोर्ट' केला.
श्रीलंका विरुध्द इंग्लडच्या सामन्यात लंकेने नियोजनबध्द गोलंदाजी करत साहेबांचा पराभव केला. दरम्यान, या सामन्यात यार्कशायरच्या चाहत्यांनी लंकेचा विजय व्हावा, अशी इच्छा जाहीर केली. यावर बोलताना चाहत्यांनी सांगितलं की, मी श्रीलंकेत १४ वर्षापूर्वी आलेल्या त्सुनामीनंतर घरे बांधण्याचे काम करत आहे. यामुळं मला वाटतं की आज लंकेचा विजय व्हावा. असं त्यांनी सांगितलं.
त्या चाहत्यांच्या अपेक्षेप्रमाणे सामना लंकेनेच जिंकला. इंग्लडला चालू शतकात झालेल्या विश्वकरंडक स्पर्धेत श्रीलंकेचा एकदाही पराभव करता आलेला नाही. उभय दोन्ही संघात आतापर्यंत चार सामने झाले आहेत. यामध्ये एकदाही श्रीलंकेचा पराभव झालेला नाही. लंका आणि इंग्लडच्या संघामध्ये २००३ च्या विश्वकरंडक स्पर्धेतील सामना झाला नाही. त्यानंतर २००७, २०११ आणि २०१५ च्या विश्वकरंडक स्पर्धेत लंकेने इंग्लडचा पराभव केला आहे.