कोलकाता - 2020 मध्ये होणाऱ्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी सध्या खेळाडूंचे लिलाव सुरू आहेत. आत्तापर्यंत लिलावात परदेशी खेळाडूंना कोट्यवधी रुपयांची किंमत मिळाली आहे. मात्र, भारतातील युवा खेळाडूंनीही आयपीएल लिलावात बाजी मारली आहे. अंडर-19 संघाचा कर्णधार प्रियम गर्ग, यशस्वी जयस्वाल, विराट सिंह या युवा खेळाडू मालामाल झाले आहेत.
-
The youngest ever to hit a double hundred in List A cricket 💯💯
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) December 19, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Yashasvi Jaiswal AKA wonder kid, welcome to the Indian Premier League🤗#IPLAuction #YashasviIsARoyal pic.twitter.com/7bnmYKTuMw
">The youngest ever to hit a double hundred in List A cricket 💯💯
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) December 19, 2019
Yashasvi Jaiswal AKA wonder kid, welcome to the Indian Premier League🤗#IPLAuction #YashasviIsARoyal pic.twitter.com/7bnmYKTuMwThe youngest ever to hit a double hundred in List A cricket 💯💯
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) December 19, 2019
Yashasvi Jaiswal AKA wonder kid, welcome to the Indian Premier League🤗#IPLAuction #YashasviIsARoyal pic.twitter.com/7bnmYKTuMw
सतरा वर्षीय मुंबईकर खेळाडू यशस्वी जयस्वाल याला राजस्थान रॉयल्स संघाने 2.40 कोटी रुपये मोजत आपल्या संघात घेतले. यशस्वी जयस्वाल हा विजय हजारे ट्रॉफीमध्ये कमी वयात द्विशतकी खेळी केल्याने चर्चेत आला. जानेवारी महिन्यामध्ये होणाऱ्या अंडर-19 वर्ल्ड कप संघातही त्याला स्थान मिळाले आहे.
हेही वाचा - IPL Auction २०२० LIVE : 'ईटीव्ही भारत'चे खास कव्हरेज, हेटमायरसाठी दिल्लीने मोजले 'इतके' कोटी
यशस्वी जयस्वाल एकेकाळी उदरनिर्वाहासाठी मुंबईमध्ये पाणीपुरी विकायचा. आयपीएलच्या लिलावात 20 लाख बेस प्राईज असलेला यशस्वी एका दिवसात करोडपती झाला. यशस्वीच्या यशात अर्जुन तेंडुलकरचाही वाटा आहे. या दोघांची मैत्री बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत झाली होती. राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षण घेत असताना अर्जुन आणि यशस्वी एकाच खोलीमध्ये राहायचे. त्यानंतर अर्जुनने यशस्वी आणि सचिन यांची भेट घडवून आणली. यशस्वीचा खेळ पाहून मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरही त्याचा चाहता झाला.