लंडन - आयसीसी विश्वकरंडक स्पर्धा आता 'रंगतदार' वळवणार आली आहे. कोणता संघ उपांत्य फेरीत पोहोचणार या विषयी तर्कवितर्क सुरू आहेत. असे असताना ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधार मायकल क्लार्कने भारत आणि ऑस्ट्रेलियात पहिल्या तीनमध्ये राहतील, असे भाष्य केले. तसेच क्लार्कने केवीन पीटरसन आणि मायकल वॉन यांनी काहीही सांगितले तरी इंग्लड विश्वकरंडक जिंकणार नाहीत, असे भाकित वर्तवले आहे.
आयसीसीच्या विश्वकरंडक स्पर्धेत कोणते संघ उपांत्य फेरी खेळणार यावर अनेक दिग्गज खेळाडू आपले मत व्यक्त करत आहे. या विषयावर मायकल क्लार्कनेही आपले मत व्यक्त केले. तो म्हणतो, भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन संघ पहिल्या तीन क्रमांकात असतील. भारत जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीमुळे विश्वकरंडक जिंकू शकतो, तसा ऑस्ट्रेलिया डेव्हिड वार्नरच्या फलंदाजीने विश्वकरंडक जिंकू शकतो, असे सांगितले आहे.
या स्पर्धेत जसप्रीत बुमराह महत्त्वाच्या वेळी विकेट घेत आहे. तर प्रत्येक सामन्यात डेव्हिड वॉर्नर खोऱ्याने धावा जमवताना दिसत आहे. मायकल क्लार्क ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आहे.