मेलबर्न - ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू महिला खेळाडू एलिस पॅरीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका ऐतिहासिक विक्रमाला गवसणी घातली आहे. तिने सर्वात कमी एकदिवसीय सामन्यात ३००० धावांसह १५० गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. असा पराक्रम करणारी महिला आणि पुरूष क्रिकेटपटूंमध्ये पॅरी पहिली खेळाडू ठरली आहे. दरम्यान, पॅरीने हा विक्रम ११० सामन्यात खेळताना केला.
महिला क्रिकेटमध्ये पॅरीसारखा पराक्रम अन्य कोणत्याही खेळाडूला करता आलेला नाही. पण, पुरूष क्रिकेटमध्ये अनेक खेळाडूंनी असा विक्रम केला आहे. मात्र, सर्वात कमी सामन्यात असा विक्रम करणारी पॅरी पहिली ठरली.
दरम्यान, यापूर्वी पुरूष क्रिकेटमध्ये बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू साकिब अल हसनने हा विक्रम केला होता. त्याने हा विक्रम ११९ सामन्यात केला. यानंतर इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू अँड्र्यू फ्लिंटॉफचा नंबर लागतो, त्याने १२९ सामन्यात खेळाताना या विक्रमाला गवसणी घातली होती.
या यादीत दक्षिण आफ्रिकेचा लांन्स क्लूझनरही असून त्याने १३२ सामन्यात हा विक्रम केला. पाकिस्तानचा माजी कर्णधार इमरान खानने १४३ सामन्यात असा पराक्रम केला होता. मात्र, पॅरीने ११० सामन्यात असा पराक्रम करत या यादीत पहिले स्थान पटकावले आहे.
हेही वाचा - धोनी सध्या काय करतो...! व्हिडिओ पाहा आणि तुम्हीच ठरवा
हेही वाचा - अजिंक्य रहाणेने शेअर केला नन्ही परीसोबतचा 'क्युट' फोटो, पाहाच एकदा