सिडनी - खेळाडूंच्या क्षमतेवर विश्वास ठेवणे हे चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या यशाचे रहस्य आहे. या संघाचा भाग असलेले धोनी आणि फ्लेमिंग यांचा मी आयुष्यभर ऋणी राहीन, अशी प्रतिक्रिया ऑस्ट्रेलियाचा माजी अष्टपैलू शेन वॉटसनने दिली आहे. वॉटसन इंडियन प्रीमियर लीगचे (आयपीएल) पहिले विजेतेपद जिंकणाऱ्या राजस्थान रॉयल्स संघाचा सदस्य होता. यानंतर, तो २०१८ मध्ये विजेतेपद पटकावलेल्या चेन्नई सुपर किंग्ज संघाचादेखील एक भाग होता.
वॉटसनने इन्स्टाग्राम लाइव्हवर चेन्नई सुपर किंग्जशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, “तुम्ही १० धावा करत नाही आणि तरीही तुम्ही संघात आहात. गेल्या हंगामात माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धोनी आणि स्टीफन फ्लेमिंगचे आभार मानतो. बर्याच सामन्यात अपयशी ठरल्यानंतर मला असे वाटले की ते मला संघातून बाहेर काढतील. पण त्यांनी तसे केले नाही.”
२०१८ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या अंतिम सामन्यात वॉटसनने ५७ चेंडूत ११७ धावांची तुफानी खेळी खेळली होती. यात त्याने ११ चौकार आणि आठ षटकार ठोकत चेन्नईला विजेतेपद मिळवून दिले होते.