अबुधाबी - शेख झायेद स्टेडियममध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सच्या फलंदाजांनी रॉयल चॅलेंजर बंगळुरूच्या गोलंदाजीसमोर सपशेल शरणागती पत्कारली. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताचा डाव बंगळुरूच्या माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, युजवेंद्र चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत कोलकाताची दाणादाण उडवली. यात सिराजने ८ धावांत ३ विकेट घेत कोलकाताची कंबर मोडली. या कामगिरीमुळे त्याला सामनावीरच्या पुरस्काराने गौरविण्यात आले.
सामना संपल्यानंतर बोलताना सिराज म्हणाला, या प्रदर्शनासाठी मी अल्लाहचे आभार मानू इच्छितो. यानंतर विराटचे आभार, कारण त्याने मला नव्या चेंडूने गोलंदाजी करण्याची संधी दिली. मी नव्या चेंडूवर गोलंदाजीचा भरपूर सराव करत होतो. पण, कोलकाताविरुद्धच्या सामन्यात मला नव्या चेंडूने गोलंदाजी करण्यास मिळेल असे वाटले नव्हते. तसेच यासंदर्भात कोणतीही रणणिती आखण्यात आलेली नव्हती. पण मला विराटने अचानक सांगितले, मियां रेडी हो जाओ.
सिराजने आपल्या पहिल्या षटकात राहुल त्रिपाठीला बाद केले. यानंतर त्याच षटकातील पुढील चेंडूवर नितीश राणाला शून्यावर क्लिन बोल्ड केले. दरम्यान, राणा ज्या चेंडूवर बोल्ड झाला तो चेंडू माझा फेव्हरेट होता, असे सिराजने सांगितले. याबाबत सिराज म्हणाला, राणाला फेकलेला चेंडू शानदार होता. मी योग्य रणणिती आखत तो चेंडू राणाला फेकला होता. पुढील षटकात त्याने टॉम बँटनला बाद केले.
हेही वाचा - SRH vs RR : हैदराबादला जबर धक्का; हुकमी एक्काच झाला पुन्हा दुखापतग्रस्त
हेही वाचा - RCB vs KKR : बरे झाले, आम्ही नाणेफेक गमवली; कर्णधार विराटची सामन्यानंतर प्रतिक्रिया