मुंबई - वेस्ट इंडीजचा अष्टपैलू खेळाडू ड्वेन ब्रोव्होने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एक नवीन गाणं लॉन्च केलं आहे. यात तो जगातील सर्व लोकांचे मनोबल वाढत आहे.
ब्राव्होने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर या गाण्याचा व्हिडिओ शेअर केला असून यातून तो आपल्या चाहत्यांनाही एक सकारात्मक संदेश देत आहे. गाण्याचे बोल 'वी नॉट गिव्हिंग अप' (We Not Giving Up) असे असून ब्राव्हो या गाण्याच्या माध्यमातून आम्ही हार मानणार नाही, असं म्हणत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
३६ वर्षींय ब्राव्हो आपल्या नवीन गाण्याच्या माध्यमातून सद्याची परिस्थिती किती वाईट आहे, हे सांगत आहे. तो या गाण्यातून कोरोना लवकरात लवकर थांबावा, अशी इच्छा व्यक्त करताना दिसत आहेत. या बरोबरच, ब्राव्होने आपल्या चाहत्यांना निरोगी राहण्यासाठी नियमितपणे हात धुणे आणि सेल्फ आयसोलेशनमध्ये राहणे, यासारखी योग्य काळजी घेण्याचे आवाहन केलं आहे.
दरम्यान, ब्रोव्होने २०१८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. यानंतर त्याने २०१९ मध्ये टी-२० मध्ये पुनरागमनाची घोषणा केली. यंदाच्या इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (आयपीएल) तो चेन्नई सुपर किंग्सचा भाग आहे. मात्र, आयपीएलवर कोरोनाचे सावट असल्याने, ही स्पर्धा होणार की नाही, याबाबत अनिश्चितता आहे.
कोरोना विषाणू बाधित रुग्णांच्या संख्येत दिवसांगणिक वाढ होत आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ८३४ झाली आहे. तर आत्तापर्यंत १९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासात देभशरात ७५ रुग्ण वाढले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.
हेही वाचा - लॉकडाऊन : पंत सद्या काय करतो, BCCI ने शेअर केला व्हिडिओ
हेही वाचा - Corona Virus : आधी मदत निधी दे.. मग तुझं ज्ञान पाजळ; विराटला नेटीझन्सनी झापलं