ETV Bharat / sports

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली 'दादा'ची भेट - ममता बॅनर्जी लेटेस्ट न्यूज

सौरव गांगुलीला काल शनिवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

West Bengal CM Mamata Banerjee reaches hospital to meet sourav ganguly
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी घेतली 'दादा'ची भेट
author img

By

Published : Jan 3, 2021, 7:10 AM IST

कोलकाता - भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला काल शनिवारी हृदयविकाराचा सौम्य झटका आला. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शनिवारी संध्याकाळी गांगुलीची भेट घेतली.

हेही वाचा - विराटच्या संघाकडून खेळण्यास स्टेनचा नकार

या भेटीनंतर ममता बॅनर्जी म्हणाल्या, "आता त्यांची तब्येत ठीक आहे. त्यांनी माझ्या आरोग्याबद्दल विचारले. मी रुग्णालय व डॉक्टरांचे आभार मानले. ते एक महान क्रिकेटपटू आहेत. इतक्या लहान वयातच त्यांना हृदयविकाराचा झटका आला हे पाहून मला वाईट वाटले. मी विचारही करू शकत नाही. सर्व खेळाडूंची आरोग्य तपासणी चालू ठेवावी. हॉस्पिटल आणि डॉक्टरांनी चांगले काम केले आहे.''

शनिवारी सकाळी जिममध्ये व्यायाम करत असतानाच गांगुलीला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्याला तत्काळ खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. गांगुलीला दक्षिण कोलकाता येथील वूडलँड या एका खासगी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्यावर शनिवारी सांयकाळी अँजिओप्लास्टीची शस्त्रक्रिया झाली.

यशस्वी भारतीय कर्णधार -

गांगुली २००० ते २००४ या काळात भारतीय संघाचा कर्णधार होता. तो भारताच्या यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. कसोटी पदार्पणाच्या सामन्याच्या पहिल्या डावात गांगुलीने १३१ धावा केल्या होत्या. यासह, तो पहिल्या कसोटी सामन्यात शतक ठोकणारा १०वा फलंदाज ठरला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.