नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच सौरव गांगुली यांनी वेगवेगळे निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी सुरूवातीला भारत-बांगलादेश यांच्यात दिवस-रात्र कसोटी सामन्यांचा प्रस्ताव ठेवला. त्यानंतर आता युवा खेळाडूंसाठी युवा खेळाडूंना मोठे गिफ्ट दिले आहे.
प्रथम श्रेणीमध्ये क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंसाठीही करार करण्यासाठी गांगुली उत्सुक आहेत. या करारा अंतर्गत या खेळाडूंना पगार किंवा फी मिळणार आहे. नवी व्यवस्थेनुसार युवा खेळाडूंना वित्तीय सुरक्षा देण्याचा निर्णय गांगुली यांनी घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने प्रथम श्रेणीमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटपटूंची आर्थिक समस्या संपुष्टात येईल, असे बोलले जात आहे.
याविषयी बोलताना गांगुलींनी सांगितले की, 'प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्याही समस्या असतात. त्यामुळे त्यांनाही आंतरराष्ट्रीय खेळाडूंना ज्या श्रेणीमध्ये मानधन दिले जाते, तसाच प्रकारे मानधन प्रथम श्रेणीमध्ये होणार आहे.' दरम्यान, गांगुली यांनी या कराराची व्यवस्था वित्त समितीला करण्यास सांगितले असल्याचे कळते. दिवाळीनंतर याबाबत निर्णय घेण्यात येईल, त्यानुसार खेळाडूंनी मानधन दिले जाणार आहे.
सध्या प्रथम श्रेणीमध्ये खेळाडूंना वर्षाला २५-३० लाख रुपये मिळतात. तसेच भारताकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळण्यासाठी करार करण्यात आले आहेत. सध्या बीसीसीआयच्या वतीने ए प्लस, ए, बी, आणि सी असे करार केले आहेत. यानुसार खेळाडूंना मानधन दिले जाते.