अबुधाबी - रॉयल चॅलेंजर बंगळुरूकडून झालेल्या दारूण पराभवानंतर कोलकाता नाइट रायडर्सचा कर्णधार इयॉन मॉर्गनने, सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेण्याचा निर्णय चुकल्याचे मान्य केले. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारायला हवे होते, असे मॉर्गनने सांगितलं. दरम्यान, या सामन्यात कोलकाताला प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ विकेट गमावून ८४ धावाच करत्या आल्या आणि बंगळुरूने हा सामना १३.३ षटकात दोन गड्यांच्या मोबदल्यात सहज जिंकला.
सामना संपल्यानंतर मॉर्नन म्हणाला, मला वाटत की आमच्या पराभवाची सुरूवात फलंदाजीपासून झाली. आम्ही सुरूवातीलाच ४-५ विकेट गमावले. हे खूप निराशजनक होते. बंगळुरूच्या गोलंदाजांनी चांगला मारा केला. पण आम्ही त्यांचा मारा व्यवस्थित खेळू शकलो नाही. नाणेफेकीनंतर दवचा विचार करून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारायला हवे होते.
बंगळुरूविरुद्धच्या सामन्यात स्फोटक फलंदाज आंद्रे रसेल आणि सुनिल नरेन अंतिम संघात नव्हते. यावर मॉर्गन म्हणाला, रसेल आणि नरेने दोघे फिट नव्हते. पण आम्हाला आशा आहे की ते लवकरच फिट होतील आणि संघात परततील. ते दोघेही महत्वाचे खेळाडू असून त्यांचे संघात परतणे आमच्यासाठी महत्वाचे आहे.
दरम्यान, अबुधाबीच्या मैदानावर बंगळुरूने कोलकातावर ८ गडी राखून मात केली. कोलकाताने दिलेले आवश्यक असलेल्या ८५ धावांचे आव्हान बंगळुरूने सहज पूर्ण केले. पहिल्यांदा फलंदाजी करताना कोलकाताचा डाव बंगळुरूच्या माऱ्यासमोर पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, चहल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी भेदक मारा करत कोलकाताची दाणादाण उडवली. यानंतर बंगलुरूने विजायासाठीचे आव्हान १४ व्या षटकात पूर्ण केले.
हेही वाचा - लोकेश राहुलकडे 'ऑरेंज' तर, दिल्लीच्या गोलंदाजाकडे 'पर्पल' कॅप
हेही वाचा - KKR vs RCB : विराटसेनेकडून कोलकाताचा धुव्वा, सिराजची चमकदार कामगिरी