चेन्नई - रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने मुंबईवर मिळवलेल्या विजयात हर्षल पटेलने ५ विकेट घेत मोलाची भूमिका निभावली. या सामन्यात बंगळुरूच्या आणखी एका गोलंदाजाची विशेष चर्चा झाली. ती म्हणजे ७ फूट उंचीच्या कायले जेमिसनची.
बंगळुरूने नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तेव्हा मुंबईने २० षटकात ९ बाद १५९ धावा केल्या. यात ख्रिस लीनने ३५ चेंडूत ४९ धावा केल्या. तर सूर्यकुमार यादवने ३१ तर इशान किशनने २८ धावांचे योगदान दिले. कर्णधार रोहित शर्मा १९ धावांवर धावबाद झाला. या सामन्यात बंगळुरूच्या गोलंदाजांनी शानदार कामगिरी केली. हर्षल पटेलने ५ विकेट घेतल्या. या शिवाय कायले जेमिसनने देखील शानदार गोलंदाजी केली. त्याच्या एका चेंडूचा व्हिडीओ चर्चेत आला आहे.
मुंबई इंडियन्सच्या डावाच्या १९व्या षटकामध्ये कायले जेमिसन गोलंदाजीसाठी आला. समोर होता कृणाल पांड्या. या षटकातील तिसऱ्या चेंडू जेमिसनने यॉर्कर फेकला. या यॉर्करचा सामना करण्यासाठी कृणाल सरसावला. मात्र यॉर्कर एवढा घातक होता की कृणालच्या हातात असलेल्या बॅटचे दोन तुकडे झाले.
-
KYLE JAMIESON ON 🔥FIRE pic.twitter.com/gWb82JhTLR
— SRINIVAS MADAR (@srinivas_madar) April 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">KYLE JAMIESON ON 🔥FIRE pic.twitter.com/gWb82JhTLR
— SRINIVAS MADAR (@srinivas_madar) April 10, 2021KYLE JAMIESON ON 🔥FIRE pic.twitter.com/gWb82JhTLR
— SRINIVAS MADAR (@srinivas_madar) April 10, 2021
सोशल मीडियावर याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. दरम्यान आयपीएल सुरु होण्याअगोदर बंगळुरूने लिलावामध्ये न्यूझीलंडचा जलदगती गोलंदाज कायले जेमिसन याच्यावर १५ कोटी रुपयांची बोली लावत आपल्या संघात घेतले आहे. त्याने आपल्या पहिल्या आयपीएल सामन्यात ४ षटकांमध्ये २७ धावा देत १ गडी बाद केला.
हेही वाचा - IPL २०२१: आमच्यासाठी पहिला सामना नाही तर विजेतेपद महत्वाचं; सलामीचा सामना गमावल्यानंतर रोहितची प्रतिक्रिया
हेही वाचा - 'पहिला सामना देवाला, खंड पडायला नको म्हणून दुसरे काही नाही', मुंबईच्या पराभवानंतर ट्विटचा पाऊस