कोलंबो - इंग्लंडमध्ये कोरोनाचा नवा प्रकार आढळून आला आहे. अशात इंग्लंडचा संघ श्रीलंकेच्या दौऱ्यावर पोहोचला आहे. तेव्हा श्रीलंकेमध्ये इंग्लंड खेळाडूंसह त्यांच्या साहित्याला विमातळावर सॅनिटायईज करण्यात आले. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
इंग्लंड खेळाडूंची श्रीलंका दौऱ्याला जाण्याआधी कोरोना चाचणी करण्यात आली. यात सर्व खेळाडू निगेटिव्ह आले. त्यानंतर इंग्लंडचा संघ श्रीलंकेला जाण्यासाठी रवाना झाला. आज रविवारी सकाळी इंग्लंडचा संघ श्रीलंकेत दाखल झाला आहे. विमानतळावर उतरल्यानंतर तिथे पीपीई कीट घालून तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी इंग्लंडच्या क्रिकेटपटूंना एका रांगेत उभे करुन त्यांना सॅनिटाईज केले. तसेच काही कर्मचारी खेळाडूंचे सामान घेऊन सॅनिटाईज करताना पाहायला मिळाले. त्यानंतर विमानतळावर सर्व खेळाडूंची कोरोना चाचणी करण्यात आली.
-
The @englandcricket have arrived in Sri Lanka. Stringent quarantine on arrival at the airport. Great to be here. 🇱🇰🏏 pic.twitter.com/aYYDxorKPZ
— Danny Reuben (@dannyreuben) January 3, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">The @englandcricket have arrived in Sri Lanka. Stringent quarantine on arrival at the airport. Great to be here. 🇱🇰🏏 pic.twitter.com/aYYDxorKPZ
— Danny Reuben (@dannyreuben) January 3, 2021The @englandcricket have arrived in Sri Lanka. Stringent quarantine on arrival at the airport. Great to be here. 🇱🇰🏏 pic.twitter.com/aYYDxorKPZ
— Danny Reuben (@dannyreuben) January 3, 2021
दरम्यान, कोरोनाच्या प्रोटोकॉलनुसार इंग्लंड संघाचे सर्व सदस्यांना काही दिवस क्वारंटाइन राहावे लागणार आहे. यात त्यांची दोन दिवसांनी कोरोना चाचणी केली जाणार आहे. कोरोना निगेटिव्ह आढळलेल्या खेळाडूंना जैव सुरक्षित वातावरणात प्रवेश दिला जाईल. उभय संघात १४ जानेवारी ते २६ जानेवारी या दरम्यान दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.
हेही वाचा - शेवटच्या कसोटीसाठी टीम इंडियाचा ब्रिस्बेनला जाण्यास नकार?
हेही वाचा - WHAT A START!!..नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी क्रिकेटपटूने केला साखरपुडा