चेन्नई - इंग्लंडच्या गोलंदाजीला तोंड देण्यासाठी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने सराव सत्रात घाम गाळला. विराटने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीनंतर पॅटर्निटी लिव्ह घेतली होती. मुलीच्या जन्मानंतर तो पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तयारीला लागला आहे.
चेन्नईमधील सहा दिवसांचा क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर भारतीय संघाने सरावाला सुरूवात केली. विराटने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर सराव करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याला त्याने 'मान खाली ठेवून काम करत राहा' असे कॅप्शन दिले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, उभय संघातील मालिकेला ५ फेब्रुवारीपासून सुरूवात होणार आहे. यातील पहिले दोन सामने चेन्नईत तर राहिलेले दोन सामने अहमदाबाद येथे खेळली जाणार आहेत.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला दोन विजयाची गरज
ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित केल्याने, कोणताच संघ न्यूझीलंडच्या ७० टक्के गुणाशी बरोबरी करू शकणार नाही. न्यूझीलंडविरुद्ध अंतिम सामना खेळण्यासाठी भारत, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एका संघाला संधी आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेवर आता सर्व समीकरणे आहेत.
भारतीय संघाने जर इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत किमान दोन विजय मिळवले तर तो अंतिम सामन्यासाठी पात्र ठरेल. इंग्लंडला अंतिम फेरीचे तिकीट मिळवण्यासाठी तीन सामने जिंकावी लागणार आहेत. तर उभय संघातील ही मालिका जर अनिर्णीत राहिली तर ऑस्ट्रेलियाचा संघ अंतिम फेरीत पोहचेल. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १८ ते २२ जून या दरम्यान, ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे.
हेही वाचा - IND vs ENG: चेन्नई कसोटीआधी इंग्लंडचा धाकड फलंदाज संघात परतला
हेही वाचा - पाकिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी दक्षिण अफ्रिकेचा संघ लाहोरमध्ये दाखल