वेलिंग्टन - भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सध्या पहिली कसोटी खेळवण्यात येत आहे. 'रन मशीन' असे बिरूद मिरवणारा भारताचा कर्णधार विराट सध्या फॉर्मात नाही. पहिल्या डावात २ तर, दुसऱया डावात तो १९ धावांवर बाद झाला. असे असले तरी, त्याने दुसऱ्या डावात ११ वी धाव घेताच बीसीसीआयच्या 'बॉस'ला पछाडले आहे.
हेही वाचा - भारतीय फुटबॉल संघाचे माजी खेळाडू अशोक चॅटर्जी यांचे निधन
कोहलीने ११वी धाव घेत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या भारतीय फलंदाजांमध्ये सौरव गांगुलीला मागे टाकले. या विक्रमाच्या यादीत माजी फलंदाज सचिन तेंडुलकर पहिल्या स्थानावर विराजमान असून त्याच्या खात्यात कसोटीत १५,९२१ धावा जमा आहेत.
कसोटीत सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
- सचिन तेंडुलकर - १५ हजार ९२१
- राहुल द्रविड - १३ हजार २६५
- सुनील गावस्कर - १० हजार १२२
- व्हीव्हीएस लक्ष्मण - ८ हजार ७८१
- वीरेंद्र सेहवाग - ८ हजार ५०३
- विराट कोहली - ७ हजार २१६*
- सौरव गांगुली - ७ हजार २१२