मुंबई - आज जागतिक महिला दिन. दरवर्षी ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने महिलांप्रति आदर व्यक्त करतो. यानिमित्ताने वेगवेगळ्या कार्यक्रमांचेही आयोजन केले जाते. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने या दिवसाच्या निमित्ताने, त्याची पत्नी आणि मुलगी या दोघींसह जगभरातील महिलांना, जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पत्नी अनुष्का शर्मा आणि मुलगी वामिका यांचा एक फोटो शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहले आहे की, 'एखाद्या बाळाला जन्म देताना पाहणे हा अविश्वसनीय आणि जबरदस्त अनुभव आहे. तो अनुभवल्यानंतर तुम्हाला महिलेच्या खऱ्या शक्तीची जाणीव होते. त्यांची थोरवी समजते. देवाने मातृत्वाचे वरदान फक्त स्त्रियांनाच दिले आहे. पुरुषांना नाही. याचे कारण म्हणजे स्त्रिया या पुरुषांपेक्षा अधिक शक्तीशाली असतात.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विराट पुढे त्याच्या पोस्टमध्ये लिहतो की, माझ्या आयुष्यातील सर्वात मजबूत आणि सर्वात कोमल हृदयाच्या महिलेला, महिला दिनाच्या शुभेच्छा. त्याचबरोबर जी आपल्या आईसारखी होणार आहे, तिला देखील शुभेच्छा. जगातील सर्व अद्भूत महिलांना, महिला दिवसाच्या शुभेच्छा.'
विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७ मध्ये लग्न केलं. लग्नापूर्वी या दोघांमध्ये चांगली मैत्री होती. याच मैत्रीचे प्रेमात रुपांतर झालं. दोघे ११ जानेवारी २०२१ रोजी आई-बाबा झाले. त्यानंतर त्यांनी १ फेब्रुवारी रोजी त्यांच्या मुलीचे नाव वामिका ठेवल्याचं जाहीर केलं.
हेही वाचा - इंग्लंड संघातून 'या' खेळाडूला लवकरच मिळणार डच्चू; वॉनची भविष्यवाणी
हेही वाचा - विंडीजचा मालिकाविजय, तिसऱ्या टी-२० सामन्यात लंकेला हरवले