ETV Bharat / sports

Aus vs Ind : रहाणेच्या शतकी खेळीवर विराट खुश; म्हणाला...

विराटने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक ट्विट केले आहे. यात त्याने, आपल्या भारतीय संघासाठी आणखी एक चांगला दिवस, कसोटी क्रिकेट सर्वोत्कृष्ट. नक्कीच टॉप फलंदाजी जिंक्य असे, म्हटलं आहे.

virat kohli react to ajinkya rahane s fine century at mcg during 2nd test match vs australia
Aus vs Ind : रहाणेच्या शतकी खेळीवर विराट खुश; म्हणाला...
author img

By

Published : Dec 27, 2020, 3:36 PM IST

मुंबई - भारतीय संघ संकटात असताना कर्णधार अजिंक्य रहाणेने रविंद्र जडेजासोबत महत्वपूर्ण भागिदारी करत वैयक्तिक शतक झळकावले. रहाणेच्या या खेळीच्या जोरावर भारतीय संघाने बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवसाअखेर ५ बाद २७७ धावा केल्या आहेत. भारतीय संघाकडे पहिल्या डावात आतापर्यंत ८२ धावांची महत्वपूर्ण आघाडी झाली आहे. दरम्यान, रहाणेच्या शतकी खेळीवर भारतीय संघाचा नियमित कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे.

विराटने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर एक ट्विट केले आहे. यात त्याने, आपल्या भारतीय संघासाठी आणखी एक चांगला दिवस, कसोटी क्रिकेट सर्वोत्कृष्ट. नक्कीच टॉप फलंदाजी जिंक्य असे, म्हटलं आहे.

  • Another great day for us. Proper test cricket at its best. Absolutely top knock from Jinks👌@ajinkyarahane88

    — Virat Kohli (@imVkohli) December 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

अजिंक्य रहाणेने दुसऱ्या दिवसाअखेर २०० चेंडूचा सामना करत नाबाद १०४ धावा केल्या आहेत. यात १२ चौकारांचा समावेश आहे. रहाणेने जडेजासोबत सहाव्या गड्यासाठी १०४ धावांची भागिदारी करत संघाला मजबूत स्थितीत आणले. जडेजाने नाबाद ४० धावा करत रहाणेला चांगली साथ दिली.

दरम्यान, भारतीय संघाने पहिल्या दिवशी ऑस्ट्रेलियाला १९५ धावांमध्ये गुंडाळले. त्यानंतर पहिल्या दिवशी १ बाद ३६ अशी आश्वासक सुरूवात केली. दुसऱ्या दिवशी ठराविक अंतराने विकेट गेल्यानंतर रहाणेने कर्णधाराला साजेशी खेळी केली.

हेही वाचा - ''....नाहीतर कायदेशीर कारवाई होईल'', माजी क्रिकेटपटू बिशनसिंग बेदींची डीडीसीएला इशारा

हेही वाचा - AUS vs IND : कर्णधार अजिंक्य रहाणेच्या 'झुंजार' शतकामुळे भारताला ८२ धावांची आघाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.