ETV Bharat / sports

IND Vs ENG: विराट अहमदाबाद कसोटीला मुकण्याची शक्यता, जाणून घ्या कारण - विराटने पंचाशी घातली हुज्जत न्यूज

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दुसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी पंच नितीन मेनन यांच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. विराट बराच वेळ पंचांशी निर्णयावरुन वाद घालताना पाहायला मिळाला. जो रूटला आऊट न दिल्यामुळे कर्णधार विराट कोहली खूप चिडला होता.

Virat could face a one-match ban for showing dissent at umpire's decision
IND Vs ENG: विराट अहमदाबाद कसोटीला मुकण्याची शक्यता, जाणून घ्या कारण
author img

By

Published : Feb 17, 2021, 3:45 PM IST

चेन्नई - भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धचा चेन्नईतील दुसरी कसोटी सामना ३१७ धावांनी जिंकून चार सामन्याच्या मालिकेत १-१ ने बरोबरी साधली. २४ फेब्रुवारीपासून अहमदाबादच्या मोटेरा स्टेडियमवर या मालिकेचा तिसरा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघ अडचणीत आल्याचे दिसत आहे. कर्णधार विराट कोहलीवर तिसऱ्या कसोटीत बंदीचा धोका आहे. यामुळे विराट तिसऱ्या कसोटीत खेळणार की नाही याबाबत प्रश्न चिन्ह आहे.

काय आहे प्रकरण -

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने दुसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी पंच नितीन मेनन यांच्या निर्णयावर आक्षेप नोंदवला होता. विराट बराच वेळ पंचांशी निर्णयावरुन वाद घालताना पाहायला मिळाला. जो रूटला आऊट न दिल्यामुळे कर्णधार विराट कोहली खूप चिडला होता.

काय आहे आयसीसीचा नियम

आयसीसीच्या नियमांनुसार एखाद्या खेळाडूने पंचांच्या निर्णयावर नाराजी दर्शवली तर त्या खेळाडूंवर लेव्हल १ किंवा लेव्हल २ शुल्क आकारले जाते. या शुल्कामुळे, खेळाडूला १ ते ४ दरम्यान डिमिरेट गुण दिले जातात. जर एखाद्या खेळाडूला २४ महिन्यांच्या कालावधीत ४ डिमिरेट गुण मिळाले तर त्याच्यावर एक कसोटी किंवा दोन एकदिवसीय सामन्यांसाठी बंदी घालण्यात येते.

विराटवर बंदीची शक्यता -

विराट कोहलीला २०१९ च्या अखेरीस दोन डिमिरेट गुण मिळाले आहेत. पंचांच्या चेन्नईत झालेल्या निर्णयावर नाराजीमुळे विराट कोहलीला दोन किंवा त्याहून अधिक डिमिरेट गुण मिळाले तर त्याच्यावर एका कसोटीसाठी बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. हे प्रकरण पाहता, विराटला अहमदाबादच्या दिवस-रात्र कसोटी सामन्याला मुकावे लागू शकते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.