नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीचा आज ३१ वा वाढदिवस आहे. विराट कोहलीने आत्तापर्यंत यशाची अनेक शिखरे पार केली आहेत. त्यांच्या अफलातून खेळीमुळे भारतीयांच्या मनामनात त्याने स्थान मिळवले आहे. भारतातूनच नाही तर जगभरातून विराटवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. वाढदिवशी विराटने स्वतःलाच म्हणजे कुमार वयातील चीकूला एक प्रेरणादायी पत्र लिहिले आहे.
३१ व्या वाढदिवशी विराटने एक खास पत्र स्वत:लाच लिहिले आहे. १५ वर्षांच्या विराटलीला मी माझ्या जीवनाचा प्रवास सांगत आहे, असे कॅप्शन त्याने ट्विटला दिले आहे. त्याबरोबरच हाताने लिहिलेले एक पत्रही पोस्ट केले आहे. तु स्वप्नांचा पठलाग कर, चांगल्या संधी तुझ्या जीवनात येतील, त्यांच्यासाठी कायम तयार रहा, जीवनाचा प्रवास रोमांचकारी असून प्रत्येक अपयश आणि संधीमधून तुला शिकायला मिळेल. कुटुंबावर प्रेम करत रहा. उंच झेप घेण्याचं स्वतःला आश्वासन दे, त्यासाठी कायम प्रयत्न करत रहा, असे पत्रात लिहिले आहे.
-
My journey and life's lessons explained to a 15-year old me. Well, I tried my best writing this down. Do give it a read. 😊 #NoteToSelf pic.twitter.com/qwoEiknBvA
— Virat Kohli (@imVkohli) November 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">My journey and life's lessons explained to a 15-year old me. Well, I tried my best writing this down. Do give it a read. 😊 #NoteToSelf pic.twitter.com/qwoEiknBvA
— Virat Kohli (@imVkohli) November 5, 2019My journey and life's lessons explained to a 15-year old me. Well, I tried my best writing this down. Do give it a read. 😊 #NoteToSelf pic.twitter.com/qwoEiknBvA
— Virat Kohli (@imVkohli) November 5, 2019
विराट कोहलीचा ५ नोव्हेंबर १९८८ रोजी दिल्लीतील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्याचा जन्म झाला. चीकू हे विराटचे टोपणनाव आहे. रणजी सामन्यामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याने भारतीय सघांत विराटला संधी मिळाली. त्यानंतर विराटने मागे वळून पाहिले नाही. प्रत्येक सामन्यामध्ये त्याचा खेळ सुधारतच गेला. कसोटी सामन्यांमध्ये भारताकडून खेळताना सर्वांत जास्त द्विशतकं करण्याचा विक्रम विराटच्या नावावर झाला आहे. तर कसोटीत त्याने ७ हजार धावा पूर्ण केल्या. तर एकदिवसीय सामन्यात सर्वात जलद ११ हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम विराटने केला.
माजी क्रिकेटपटू आणि धडाकेबाज फलंदाज विरेंद्र सेहवागने देखील विराटला वाढदिवसाच्या ट्विटरवरून एक फोटो शेअर करत खास शुभेच्छा दिल्या आहे. विराट कोहली, सचिन तेंडूलकर आणि सेहवाग बरोबर चर्चा करताना एका जुना फोटो आहे. तसेच 'बादलों की तरह छाये रहो, हमेशा खुश रहो' म्हणत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.