ETV Bharat / sports

Vijay Hazare Trophy २०२१ : बिहारच्या खेळाडूला कोरोनाची लागण - बिहार क्रिकेट संघातील खेळाडूला कोरोनाची लागण न्यूज

आमच्या संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्या खेळाडूला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. तसेच त्याच्या संपर्कातील खेळाडूंना देखील संघापासून वेगळं करण्यात आलं आहे. ते आता बंगळुरूमध्ये आहेत आणि त्यांना आता प्रवास करता येणार नाही, असे बिहार क्रिकेट संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

vijay hazare trophy 2021 bihar one player is found covid-19 postive
Vijay Hazare Trophy २०२१ : बिहारच्या खेळाडूला कोरोनाची लागण
author img

By

Published : Feb 23, 2021, 3:24 PM IST

बंगळुरू - कोविड-१९ चा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर सय्यद मुश्ताक अली करंडकाद्वारे देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेला सुरूवात झाली. ही टी-२० स्पर्धा यशस्वीरित्या पार पडल्यानंतर नुकताच विजय हजारे करंडक स्पर्धेचा आरंभ झाला आहे. परंतु आता या स्पर्धेवर कोरोनाचे सावट पसरले आहे. या स्पर्धेत सहभागी, बिहार संघाच्या एक खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्या खेळाडूला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे.

बिहार क्रिकेट संघाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं की, 'आमच्या संघातील एका खेळाडूला कोरोनाची लागण झाली आहे. त्या खेळाडूला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आलं आहे. तसेच त्याच्या संपर्कातील खेळाडूंना देखील संघापासून वेगळं करण्यात आलं आहे. ते आता बंगळुरूमध्ये आहेत आणि त्यांना आता प्रवास करता येणार नाही.'

सूत्रांच्या माहितीनुसार, बिहार संघातील सर्व खेळाडूंची चाचणी करण्यात येत आहे. यात बिहारच्या २२ खेळाडूंची चाचणी झाली आहे. बिहारच्या संघाचा समावेश विजय हजारे करंडक स्पर्धेत एलिट ग्रुप सी मध्ये आहे. त्यांचे सर्व सामने बंगळुरूमध्ये होणार आहेत. बिहारचा उद्या ( ता. २४. बुधवार) सामना उत्तर प्रदेश संघासोबत होणार आहे. दरम्यान, बिहार क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने हा सामना नियोजित वेळापत्रकानुसार होईल, असे सांगितले आहे.

हेही वाचा - IND vs ENG: फिटनेस टेस्ट पास; उमेश यादवचा भारतीय संघात परतला

हेही वाचा - राष्ट्रपती कोविंद यांच्या हस्ते होणार जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट मैदानाचे उद्घाटन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.