मुंबई - आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेसाठी मुंबई संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघाचे नेतृत्व अपेक्षेप्रमाणे श्रेयस अय्यरकडे सोपवण्यात आले आहे. तर संघाच्या उपकर्णधारपदी सूर्यकुमार यादव याची वर्णी लागली आहे. मुंबईच्या १७ सदस्यीय संघात सर्फराज खान आणि नुकत्याच पार पडलेल्या १९ वर्षाखालील आशिया चषक स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अथर्व अंकोलेकरलाही स्थान देण्यात आले आहे.
निवड समितीने मुंबईच्या १७ सदस्यीय संघाची घोषणा केली. यात युवा खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. सर्फराज खान आणि अथर्व हे मुंबईकडून विजय हजारे करंडक स्पर्धा खेळतील. अथर्वने आशिया चषकमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावली होती. अंतिम सामन्यात त्याने २८ धावामध्ये ५ गडी बाद करत भारताच्या विजयात मोलाची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे त्याचा समावेश मुंबईच्या संघात करण्यात आला आहे.
दरम्यान, मुंबई संघ हा या स्पर्धेचा गतविजेता आहे. यंदाच्या स्पर्धेत मुंबईचे सर्व सामने बंगळुरु येथे खेळवण्यात येणार आहेत.
हेही वाचा - उतावळा 'आजोबा' गुडघ्याला बाशिंग! ७० वर्षीय आजोबांकडून पी. व्ही. सिंधूला लग्नासाठी मागणी
विजय हजारे करंडकासाठी मुंबईचा संघ -
श्रेयस अय्यर (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उपकर्णधार), आदित्य तरे (यष्टीरक्षक), सर्फराज खान, शिवम दुबे, शुभम रांजणे, एकनाथ केरकर, धवल कुलकर्णी, तुषार देशपांडे, शम्स मुलानी, अथर्व अंकोलेकर, शार्दुल ठाकूर, सिद्धेश लाड, यशस्वी जैस्वाल, कृतिक हंगवाडी आणि शशांक अतार्डे
असे आहे विजय हजारे करंडक स्पर्धेत मुंबईच्या सामन्यांचे वेळापत्रक -
- मुंबई विरुद्ध सौराष्ट्र - २४ सप्टेंबर
- मुंबई विरुद्ध झारखंड - २५ सप्टेंबर
- मुंबई विरुद्ध कर्नाटक - २९ सप्टेंबर
- मुंबई विरुद्ध केरळ - १ ऑक्टोबर
- मुंबई विरुद्ध आंध्र प्रदेश - ३ ऑक्टोबर
- मुंबई विरुद्ध गोवा - ५ ऑक्टोबर
- मुंबई विरुद्ध हैदराबाद - ९ ऑक्टोबर
- मुंबई विरुद्ध छत्तीसगड - १३ ऑक्टोबर