ETV Bharat / sports

भारतासाठी सिडनी कसोटीत लढलेल्या क्रिकेटपटूला मिळाले कर्णधारपद! - हनुमा विहारी कर्णधारपद न्यूज

नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेच्या सिडनी कसोटीत त्याने रवींचंद्रन अश्विनसोबत ऐतिहासिक भागीदार रचली होती. या भागीदारीमुळे भारताला ही कसोटी बरोबरीत सोडवता आली. या सामन्यादरम्यान हनुमाला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

हनुमा विहारी
हनुमा विहारी
author img

By

Published : Feb 12, 2021, 1:19 PM IST

नवी दिल्ली - भारतीय संघाचा फलंदाज हनुमा विहारी आगामी विजय हजारे करंडक स्पर्धेत आंध्र प्रदेश संघाचे कर्णधारपद सांभाळणार आहे. तर, रिकी भूई संघाचा उपकर्णधार असेल. आंध्र क्रिकेट असोसिएशनची (एसीए) याबाबत माहिती दिली.

रिकी भूई
रिकी भूई

हनुमा सध्या इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर आहे. नुकत्याच पार पडलेल्या बॉर्डर-गावसकर कसोटी मालिकेच्या सिडनी कसोटीत त्याने रवीचंद्रन अश्विनसोबत ऐतिहासिक भागीदार रचली होती. या भागीदारीमुळे भारताला ही कसोटी बरोबरीत सोडवता आली. या सामन्यादरम्यान हनुमाला हॅमस्ट्रिंग दुखापत झाली. या दुखापतीमुळे त्याला इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर ठेवण्यात आले आहे.

हेही वाचा - श्रीशांतचे आयपीएल खेळण्याचे स्वप्न भंगले, लिलावासाठी खेळाडूंची यादी जाहीर

एसीएच्या सूत्राने सांगितले की, "हनुमा लवकरच बरा होईल. पण अद्याप तो पूर्ण तंदुरुस्त नाही. जर २० फेब्रुवारी पर्यंत तो तंदुरुस्त नसेल तर, दुसरा खेळाडू त्याची जागा घेईल." विजय हजारे करंडक २० फेब्रुवारीपासून रंगणार आहे. आंध्र प्रदेशचा संघ तामिळनाडू, पंजाब, झारखंड, मध्य प्रदेश आणि विदर्भासह बी गटात आहे. या गटातील सर्व सामने इंदूरमध्ये खेळविण्यात येणार आहेत.

आंध्र प्रदेशचा संघ -

हनुमा विहारी (कर्णधार), रिकी भुई (उपकर्णधार), सीएच क्रांति कुमार, के. अश्विन हेब्बार, सी.आर. गनानेश्वर, माहीप कुमार, के. करण शिंदे, यूएमएस गिरीनाथ (विकेटकीपर), पी. गिरीनाथ रेड्डी, शोएब एम. खान, एस. आशीष, के.वी. शशिकांत, सी.एच. स्टीफन, आय. कार्तिक रमन, एस. ध्रुव कुमार रेड्डी, जी. मनीष, डी. नरेन रेड्डी, के. नीतीश कुमार रेड्डी, एम. हरिशंकर रेड्डी, एस. चरण साईतेजा, एस. तरुण (विकेटकीपर) आणि बी. संतोष.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.