नवी दिल्ली - आपल्या नेतृत्वात कर्नाटक संघाला सय्यद मुस्ताक अली टी-२० स्पर्धेचे जेतेपद जिंकून देत मनीष पांडे लग्नाच्या बोहल्यावर चढला. रविवारी कर्नाटक संघाने तामिळनाडू संघाचा एका धावेने पराभव करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले. त्यानंतर सोमवारी मनीष पांडे दाक्षिणात्य अभिनेत्री आश्रिता शेट्टी हिच्याशी विवाहबध्द झाला.
हा विवाहसोहळा मुंबईत पार पडला असून या सोहळ्यात भारताचा माजी स्फोटक फलंदाज युवराज सिंगने पंजाबी गाण्यावर ठेका धरला. युवराजच्या डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मनीष-आश्रिता यांच्या विवाह सोहळ्यात युवराज सिंग सामिल झाला होता. त्याने 'हायो रब्बा..' या पंजाबी गाण्यावर ठेका धरला. यावेळी त्यांच्यासोबत मनीष पांडेही उपस्थित होता. व्हायरल झालेल्या व्हिडिओत युवराज जोशमध्ये डान्स करताना दिसून येत आहे.
दरम्यान, मागील काही कालावधीपासून मनीष आणि आश्रिता हे रिलेशनशिपमध्ये आहेत. आश्रिता ही दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतील मोठी अभिनेत्री आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - कसोटी अजिंक्यपद स्पर्धा : गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाची मुसंडी, भारत 'या' स्थानावर
हेही वाचा - VIDEO : वहाबने टाकला क्रिकेट इतिहासातील खतरनाक यॉर्कर, पण...