ETV Bharat / sports

VIDEO : भर मैदानात इशांत अन् वॉटसनची खडाजंगी, पंचाच्या मध्यस्थीने सुटला वाद - Shane Watson

वॉटसनने या सामन्यात २६ चेंडूत ४४ धावांची झटपट खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता.

शर्मा
author img

By

Published : Mar 27, 2019, 4:58 PM IST

दिल्ली - चेन्नई सुपर किंग्जने काल दिल्ली कॅपिटल्सला ६ गडी राखून मात देत सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. या सामन्याचा हिरो ठरला तो शेन वॉटसन. वॉटसन दिल्ली कॅपिटल्स संघाच्या गोलंदाजाचा एकीकडे समाचार घेत होता तर दुसऱ्या बाजूला तो विरोधी संघाच्या खेळाडूंबरोबर भिडताना दिसला.

इशांत शर्माने अंबाती रायुडू याला झटपट माघारी धाडल्यावर आनंद व्यक्त करताना इशांत वॉटसनाला जाऊन धडकला. त्यानंतर वॉटसन इशांतला बोट करुन बोलत होता. त्यामुळे इशांत चांगलाच भडकला. दोघात खडाजंगी सुरू झाल्यावर पंचानी मध्यस्थी करुन हे प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

इशांतसोबत बाचाबाची झाल्यावर थोड्याच वेळात वॉटसन आणि कागिसो रबाडा यांच्यात बाचाबाची झाली. रबाडा जेव्हा सहाव्या षटकात गोलंदाजी करत होता तेव्हा वॉटसनच्या गोलंदाजीवर एक धाव घेताना दोघांची टक्कर होता होता राहिली. रबाडाही त्याच्याशी वाद घालू लागला. या दोन्ही प्रकरणानंतर चेन्नईच्या फलंदाजांनी बदला म्हणून दिल्लीची गोलंदाजी चांगलीच फोडून काढत दिमाखात विजय मिळविला.

वॉटसनने या सामन्यात २६ चेंडूत ४४ धावांची झटपट खेळी केली. त्यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. अमित मिश्राने ऋषभ पंतकडून त्याला यष्टीचीत केले. वॉटसन बाद झाला तेव्हा चेन्नईचा संघ विजयासमीप पोहोचला होता.

Intro:Body:

VIDEO : भर मैदानात इशांत अन् वॉटसनची खडाजंगी, पंचाच्या मध्यस्थीने सुटला वाद

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.