नवी दिल्ली - भारतीय महिला क्रिकेटपटू मिताली राजचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त 'ट्रेंड' होत आहे. या व्हिडिओमध्ये ती चक्क साडी नेसून क्रिकेट खेळताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून समस्त सोशल मीडिया जगत तिचे भरभरून कौतुक करत आहे.
हेही वाचा - इंग्लंडची कर्णधार म्हणते, 'त्या' पराभवाने घात केला
८ मार्च म्हणजे महिला दिनानिमित्त मितालीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओसाबत तिने कॅप्शनमध्ये खास संदेशही दिला आहे. 'प्रत्येक साडी तुम्हाला बरंच काही सांगते. साडी कधी तुम्हाला तंदुरुस्त राहायला सांगत नाही. चला येणाऱ्या महिला दिनी एक अमूल्य गोष्ट सुरू करू. या महिला दिनी आपल्या तत्त्वानुसार जगण्यास सुरुवात करुया', असे मितालीने या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
मितालीने गेल्यावर्षी टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. भारताकडून मितालीने २०१२, २०१४ आणि २०१६ च्या टी -२० विश्वकरंडक स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. मात्र, तिच्या नेतृत्वाखाली भारताने एकदाही विश्वकरंडक उंचावलेला नाही. ८८ आंतरराष्ट्रीय टी-२० सामन्यांमध्ये मितालीने २३६४ धावा केल्या आहेत. या धावा करताना ३७.५२ ची तिची सरासरी राहिली आहे. या धावांमध्ये मितालीच्या १७ अर्धशतकांचा समावेश आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये आत्तापर्यंत मितालीने २०३ सामने खेळले आहेत. या सामन्यात खेळताना तिने ७ शतके आणि ५२ अर्धशतकांसह ६७२० धावा केल्या आहेत.