मुंबई - येथील वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या रणजी करंडकातील मुंबईविरुद्धच्या सामन्यात उत्तर प्रदेशने दमदार फलंदाजी केली. ग्रुप बी सामन्यात उपेंद्र यादवच्या नाबाद २०३ धावांच्या जोरावर उत्तर प्रदेशने मुंबईविरुद्ध आठ गडी राखून पहिला डाव ६२५ धावांवर घोषित केला. उपेंद्रसोबत अक्षदीप नाथनेही ११५ धावा करत त्याला साथ दिली. मात्र, दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच तो बाद झाला. मुंबईकडून रॉयस्टन डायसने सर्वाधिक ३ बळी घेतले.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाच्या मदतीसाठी धावले भारतीय हॉकीपटू
या दोघांव्यतिरिक्त रिंकू सिंगने ८४ धावांचे योगदान दिले. अक्षदीपने आपल्या खेळीत १६ चौकार आणि दोन षटकार ठोकले. तर, नाबाद राहिलेल्या उपेंद्रने २७ चौकारांव्यतिरिक्त तीन षटकारही लगावले. त्यानंतर पहिला डाव खेळण्यास उतरलेल्या मुंबईची सुरूवात चांगली झाली नाही. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा मुंबईने २० धावांवर जय बिश्ता आणि शशांक अतार्डे हे दोन फलंदाज गमावले होते. उत्तर प्रदेशकडून अंकित राजपूतने २ बळी घेतले.