ETV Bharat / sports

छोट्या भावाच्या बंदीवर कामरान अकमलने दिली प्रतिक्रिया

कामरान म्हणाला, “ उमरला माझा सल्ला आहे की त्याने शिकले पाहिजे. जर त्याने चूक केली असेल तर त्याने इतरांकडून शिकले पाहिजे. आम्ही एकत्र खेळतो आणि आपले लक्ष फक्त क्रिकेटवर असते. तो अजूनही तरुण आहे.”

umar should learn from kohli, dhoni and Tendulkar said kamran akmal
छोट्या भावाच्या बंदीवर कामरान अकमलने दिली प्रतिक्रिया
author img

By

Published : Apr 29, 2020, 4:49 PM IST

कराची - पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) उमर अकमलवर तीन वर्षासाठी बंदी घातली आहे. त्यांच्यावरील ही बंदी क्रिकेटच्या सर्व स्वरूपात लागू असेल. अकमलला फिक्सिंगच्या प्रस्तावाची मंडळाला माहिती न दिल्याबद्दल ही बंदी घालण्यात आली आहे. त्याच्या बंदीवर मोठा भाऊ कामरान अकमलने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

कामरान म्हणाला, “ उमरला माझा सल्ला आहे की त्याने शिकले पाहिजे. जर त्याने चूक केली असेल तर त्याने इतरांकडून शिकले पाहिजे. आम्ही एकत्र खेळतो आणि आपले लक्ष फक्त क्रिकेटवर असते. तो अजूनही तरुण आहे. त्याने विराट कोहलीकडून शिकले पाहिजे. आयपीएलच्या सुरुवातीच्या काळात विराट हा वेगळा खेळाडू होता, परंतु नंतर त्याने आपला दृष्टीकोन बदलला. आता पाहा तो कुठे आहे. आमचा बाबर आझम हा जगातील तीन सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे.”

तो पुढे म्हणाला, “धोनी याचे आणखी एक उदाहरण आहे. त्याने चमकदार कामगिरी करून संघाचे नेतृत्व केले. त्यानंतर सचिन पाजी नेहमीच वादापासून दूर राहिले. हे आपल्यासमोर मोठे उदाहरण आहे. आपण त्यांना पाहिले पाहिजे आणि शिकले पाहिजे. त्यांनी फक्त खेळाकडे लक्ष दिले. मैदानाबाहेरची त्याची वागणूक उत्तम होती.”

पाकिस्तान सुपर लीगची (पीएसएल) पाचवी आवृत्ती सुरू होण्यापूर्वी अकमलला फिक्सिंगची ऑफर देण्यात आली होती. पीसीबीच्या लाचलुचपत प्रतिबंधक संहितेअंतर्गत एखाद्या खेळाडूला फिक्सिंगसाठी काही प्रस्ताव आल्यास ते विनाविलंब मंडळाला कळवावे असे बंधनकारक आहे. तसे न केल्याबद्दल शिक्षेची तरतूद आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.