कराची - पाकिस्तान सुपर लीगला आजपासून सुरूवात होणार आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सामन्याआधीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने उमर अकमलचे निलंबन केले आहे. यामुळे अकमल ही स्पर्धा खेळू शकणार नाही.
पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने पीएसएलचा संघ क्वेटा ग्लॅडिएटर्सला उमर अकमलचा रिप्लेसमेंट शोधण्यास सांगितलं आहे. बोर्डाने भ्रष्टाचार विरोधी कलम ४.७१ नुसार अकमल याला निलंबित केले आहे. अकमलवर याआधीच फिक्सिंगचा आरोप करण्यात आला होता आणि त्याची चौकशी सुरू होती. यामुळे पीसीबीने ही कारवाई आली असल्याचे म्हटलं जात आहे. पण या विषयी बोलण्यात पाकिस्तान बोर्डाने नकार दिला आहे.
२९ वर्षीय उमर अकमलने पाकिस्तानसाठी शेवटचा सामना मार्च २०१९ मध्ये खेळला होता. त्याने आतापर्यंत १६ कसोटी, १२१ एकदिवसीय आणि ८४ टी-२० सामने खेळली आहे.
दरम्यान उमर काही दिवसाआधी पाकिस्तानच्या नॅशनल क्रिकेट अॅकॅडमीमध्ये झालेल्या खेळाडूंची फिटनेस चाचणीत नापास झाला. तेव्हा त्याने रागाच्या भरात ट्रेनरसमोरच सगळे कपडे काढले होते. यामुळे तो चर्चेत आला होता.
पाकिस्तान सुपर लीगमध्ये आज पहिला सामना क्वेटा ग्लॅडिएटर्स विरुद्ध इस्लामाबाद युनायटेड यांच्यात होणार आहे. कराचीच्या नॅशनल स्टेडियममध्ये होणाऱ्या या सामन्याला रात्री ९ वाजता सुरूवात होईल.
हेही वाचा -
धोनीने चक्क बाथरुममध्ये रंगवली खेळाडूंसह गाण्याची मैफिल, व्हिडिओ व्हायरल
न्यूझीलंडविरुद्ध भारतीय सलामीवीर जोडी ठरली, विराटने दिले संकेत