अबुधाबी - संयुक्त अरब अमिराती आणि आयर्लंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रद्द करण्यात आला आहे. यजमान संघात कोरोनाची प्रकरणे समोर आल्यानंतर हा निर्णय घेतला. एमिरेट्स क्रिकेट बोर्डाने याची पुष्टी केली. हा सामना आज मंगळवारी खेळवला जाणार होता.
दुसरा एकदिवसीय सामना मुख्यत: १० जानेवारी रोजी खेळला जाणार होता, परंतु एक खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर हा सामना १६ जानेवारीपर्यंत पुढे ढकलण्यात आलआ आहे. शुक्रवारी अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियमवर या दोन्ही संघांमधील पहिला एकदिवसीय सामना खेळवण्यात आला. यात यजमान आयर्लंडने सहा गडी राखून विजय मिळवला.
हेही वाचा - ICC Test Rankings : विराटचे दुसरे स्थानही गेले; अजिंक्य, अश्विनसह बुमराहला फटका