दुबई - आयसीसीने आपल्या पंचांच्या डेव्हलमेंट पॅनलची घोषणा केली असून यात भारताची जननी नारायणन आणि वृंदा राठी यांना स्थान मिळाले आहे. जननी आणि वृंदा यांच्या समावेशानंतर या पॅनलमधील महिला संख्या १२ अशी झाली आहे.
-
NEWS📰: Indian female umpires Janani Narayanan and Vrinda Rathi have been named in the International Panel of ICC Development Umpires.
— BCCI Women (@BCCIWomen) March 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Details ➡️ https://t.co/ulRiMRRadu pic.twitter.com/lW08HDHECG
">NEWS📰: Indian female umpires Janani Narayanan and Vrinda Rathi have been named in the International Panel of ICC Development Umpires.
— BCCI Women (@BCCIWomen) March 18, 2020
Details ➡️ https://t.co/ulRiMRRadu pic.twitter.com/lW08HDHECGNEWS📰: Indian female umpires Janani Narayanan and Vrinda Rathi have been named in the International Panel of ICC Development Umpires.
— BCCI Women (@BCCIWomen) March 18, 2020
Details ➡️ https://t.co/ulRiMRRadu pic.twitter.com/lW08HDHECG
३४ वर्षीय जननी या २०१८ पासून स्थानिक स्पर्धेत पंचगिरी करतात. त्यांनी सांगितलं की, 'निवडीनंतर आनंद झाला. आता मैदानावर अनुभवी लोकांकडून शिकण्याची संधी मिळाली आहे. येणाऱ्या वर्षांमध्ये स्वत:मध्ये सुधारणा करण्याची मोठी संधी मिळाली आहे.'
वृंदा यांनी सांगितलं की, 'आयसीसीच्या पॅनलवर निवड होणे हे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या संधीच्या माध्यमातून मला माझ्या ज्ञानामध्ये भर पाडण्याची संधी आहे. यामुळे मी खूप खुश आहे.'
दरम्यान, जननी आणि वृंदा यांच्या निवडीनंतर एमसीएने त्यांचे अभिनंदन केले आहे.
हेही वाचा - 'पाक खेळाडूंची टीम इंडियात खेळण्याची लायकी नाही, धावा न केल्यास फलंदाजाला फुकटात राबवा'
हेही वाचा - 'धोनी फिट असेल तर तो टीम इंडियासाठी हिट आहे'