ETV Bharat / sports

विश्वकरंडक स्पर्धेचे पात्रता सामने स्थगित, कोरोनामुळे आयसीसीने घेतला निर्णय - टी-२० विश्वकरंडक २०२२ पात्रता सामने स्थगित न्यूज

ऑस्ट्रेलियात २०२२ साली होणाऱ्या, पुरुषांच्या टी-२० विश्वकरंडकासाठी आफ्रिका आणि आशिया खंडात होणारे पात्रता फेरीचे सामने आयसीसीने स्थगित केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आयसीसीचे हा निर्णय घेतला आहे.

Three regional qualifiers for men's 2022 T20 WC postponed due to COVID-19: ICC
विश्वकरंडक स्पर्धेचे पात्रता सामने स्थगित, कोरोनामुळे आयसीसीने घेतला निर्णय
author img

By

Published : Mar 18, 2021, 5:45 PM IST

दुबई - ऑस्ट्रेलियात २०२२ साली होणाऱ्या, पुरुषांच्या टी-२० विश्वकरंडकासाठी आफ्रिका आणि आशिया खंडात होणारे पात्रता फेरीचे सामने आयसीसीने स्थगित केले आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने आयसीसीचे हा निर्णय घेतला आहे.

आशियात ३ ते ९ एप्रिल या दरम्यान पात्रता फेरीचे सामने होणार होते. यात बहरीन, कुवैत, मालदीव, कतार आणि सौदी अरेबिया या देशांचे संघ होते. आता ही स्पर्धा २३ ते २९ ऑक्टोबर या काळात घेतली जाणार आहेत. तर आफ्रिका ए आणि बी यांचे पात्रता सामने या वर्षी एप्रिल महिन्यात होणार होते. पण आता ते २५ ते ३१ ऑक्टोबर या काळात होतील. हे सामने धाना, लेसोथो, मालावी, रवांडा, स्वित्झर्लंड, युगांडासह अन्य देशात होणार आहेत.

पात्रता सामन्यासाठी विविध देशांमध्ये कोरोना व्हायरसमुळे घालण्यात आलेल्या नव्या बंधनामुळे आयसीसीने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या वर्षाच्या अखेरीस भारतात आयसीसी टी-२० विश्वकरंडक स्पर्धा होणार आहे. तर पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात विश्वकरंडक होईल. आता भारतात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. यामुळे भारतात ही स्पर्धा होईल की नाही, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

हेही वाचा - IND VS ENG ४th T२० : भारताला विजय अनिवार्य, इंग्लंडला मालिका विजयाची संधी

हेही वाचा - IND vs ENG : शार्दुलचे गचाळ क्षेत्ररक्षण, विराटचा चढला पारा; व्हिडिओ व्हायरल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.