ETV Bharat / sports

विराट म्हणाला, 'त्याचा' खेळ पाहून आम्ही पराभूत होऊ असे वाटलं होतं - विराट कोहली

सामना संपल्यानंतर बोलताना विराटने सांगितले की, 'केन विल्यम्सन ९५ धावांवर खेळत होता. यामुळे आम्हाला हा सामना जिंकता येणार नाही, असे मला वाटले होते. पण, विल्यम्सन बाद झाला आणि न्यूझीलंडला पराभूत व्हावे लागले.

The way Kane played, NZ probably deserved to win: Virat Kohli
विराट म्हणाला, 'त्याचा' खेळ पाहून आम्ही पराभूत होऊ असे वाटलं होतं
author img

By

Published : Jan 29, 2020, 9:52 PM IST

हॅमिल्टन - भारतीय संघाने आज सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आणि ५ सामन्यांच्या टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताच्या विजयानंतर बोलताना, कर्णधार विराट कोहलीने, हा सामना आम्ही जिंकू असे वाटत नव्हते, असे सांगितले.

सामना संपल्यानंतर बोलताना विराटने सांगितले की, 'केन विल्यम्सन ९५ धावांवर खेळत होता. यामुळे आम्हाला हा सामना जिंकता येणार नाही, असे मला वाटले होते. पण, विल्यम्सन बाद झाला आणि न्यूझीलंडला पराभूत व्हावे लागले. पराभव झाल्यानंतर विल्यम्सनबद्दल मला वाईट वाटले. कारण एवढी मोठी वैयक्तिक धावसंख्या उभारल्यानंतर सामना गमवावा लागतो. तेव्हा काय वेदना होतात हे मला माहीत आहे.'

मोहम्मद शमीने २० व्या षटकात केन विल्यम्सनला माघारी धाडले. त्यानंतर शेवटच्या चेंडूवर विजयासाठी न्यूझीलंडला केवळ एकच धाव हवी होती. पण शमीने टिच्चून गोलंदाजी करत रॉस टेलरला बाद केले.

शमीविषयी बोलताना विराटने सांगितले की, 'शमी शेवटचा चेंडू टाकणार होता. त्यावेळी आमची चर्चा झाली. यावेळी आम्ही स्टंम्प्सलाच टार्गेट करण्याचा निर्णय घेतला. कारण तसे केले नसते तर एक धाव सहज निघाली असती.'

न्यूझीलंडविरुद्ध राहिलेले २ सामने जिंकून मालिका ५-० जिंकण्याचा निर्धार विराटने व्यक्त केला आहे. दरम्यान, भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातल्या तिसरा सामना रंगतदार ठरला. मुख्य सामना 'टाय' ठरल्याने सुपर ओव्हर खेळवण्यात आली. न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये १७ धावा करत भारतासमोर विजयासाठी १८ धावांचे लक्ष्य ठेवले. तेव्हा भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल या जोडीने ऐतिहासिक विजयाची नोंद केली.

भारताला एकवेळ शेवटच्या दोन चेंडूत विजयासाठी १० धावांची गरज होती. तेव्हा रोहित शर्माने सलग दोन चेंडूंवर उत्तुंग षटकार ठोकून रोमांचक विजय मिळवून दिला. भारतीय संघाच्या विजयाचा 'हिरो' रोहित शर्मा सामनावीर ठरला. भारताने या 'सुपर' विजयासह ५ सामन्याच्या टी-२० मालिकेत ३-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. भारताने पहिल्यांदाच न्यूझीलंडला त्यांच्या घरच्या मैदानावर टी-२० मालिकेत पराभूत केले आहे.

हेही वाचा - सुपर ओव्हर न्यूझीलंडसाठी अशुभ, केनची कबुली... वाचा एका क्लिकवर संपूर्ण रेकॉर्ड

हेही वाचा - IND VS NZ : सुपर ओव्हरमध्ये रोहितचे २ चेंडूवर २ षटकार, टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय

Intro:Body:

NEWS

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.