कोलकाता - बंगाल क्रिकेट असोसिएशनने (सीएबी) ३० दिव्यांग क्रिकेटपटूंना विमा देण्याची घोषणा केली आहे. या खेळाडूंमध्ये श्रवणशक्ती, दृष्टिहीन आणि शारीरिक अपंगत्व असणार्या क्रिकेटपटूंचा समावेश आहे. जागतिक अपंगत्व दिन-२०२०च्या निमित्ताने कॅबने गुरुवारी ईडन गार्डन स्टेडियममध्ये याची घोषणा केली.
हेही वाचा - 'सायकलवाले काका' लय भारी... वयाच्या एकाहत्तरीमध्ये पळवतात सुसाट सायकल!
कॅबचे अध्यक्ष अभिषेक दालमिया म्हणाले की, "जागतिक अपंगत्व दिनाची यंदाची थीम अधिकाधिक लोकांपर्यंत घेऊन जाणे हा मुद्दा आहे. हे लक्षात ठेवून आम्ही त्यांचा समावेश केला आहे."
ते म्हणाले, "क्रिकेटच्या प्रगतीसाठी काहीही करण्यास सीएबी वचनबद्ध आहे. त्यामुळे आम्ही तिन्ही प्रवर्गातील सक्रिय क्रिकेटपटू निवडू आणि त्यांना एका वर्षाचा विमा देऊ'', असे ते म्हणाले.
दिव्यांग क्रिकेटपटू समितीचे अध्यक्ष गौर मोहन घोष म्हणाले, "या खेळाडूंचा इतका चांगला सन्मान होत आहे, हे पाहून बरे वाटले. ते बंगाल क्रिकेट कुटुंबातील एक सदस्य आहेत. अध्यक्ष नेहमीच त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि त्यांना प्रत्येक शक्य मार्गाने मदत केली आहे."