अहमदाबाद - भारत-इंग्लंड यांच्यातील मालिका दुसऱ्या टप्प्यात आली आहे. उभय संघातील नियोजित टी-२० मालिकेला १२ मार्चपासून सुरूवात होणार आहे. या मालिकेत भारतीय खेळाडू पुन्हा रेट्रो जर्सीत पाहायला मिळणार आहेत. मालिकेला सुरूवात होण्याआधी खेळाडूंनी रेट्रो जर्सीतील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. दरम्यान, ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही भारतीय संघ याच जर्सीत मैदानावर उतरला होता.
-
Joy of little things ✨ pic.twitter.com/ArSLB6WpIN
— Navdeep Saini (@navdeepsaini96) March 10, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Joy of little things ✨ pic.twitter.com/ArSLB6WpIN
— Navdeep Saini (@navdeepsaini96) March 10, 2021Joy of little things ✨ pic.twitter.com/ArSLB6WpIN
— Navdeep Saini (@navdeepsaini96) March 10, 2021
भारत आणि इंग्लंड यांच्यात ५ सामन्याची टी-२० मालिका खेळवण्यात येणार आहे. हे पाचही सामने अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत. १२, १४, १६, १८ आणि २० मार्चला हे सामने होतील. भारतीय वेळेनुसार सायंकाळी ७ वाजल्यापासून सामन्यांचे प्रक्षेपण सुरू होईल.
- भारतीय संघ -
- विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), केएल राहुल, शिखर धवन, श्रेयस अय्यर, सुर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), युझवेंद्र चहल, वरुण चक्रवर्ती, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, राहुल तेवतिया, टी. नटराजन, भुवनेश्वर कुमार, दीपक चाहर, नवदीप सैनी आणि शार्दुल ठाकूर.
- इंग्लंडचा संघ -
- इयॉन मॉर्गन (कर्णधार), मोईन अली, जोफ्रा आर्चर, जॉनी बेअरस्टो, सॅम बिलींग, जोस बटलर, सॅम कुरन, टॉम कुरन, ख्रिस जॉर्डन, लाएम प्लंकेट, डेवीड मलान, आदिल रशीद, जेसन रॉय, बेन स्टोक्स, रिसे टॉप्ली, मार्क वूड, जॅक बॉल आणि मॅट पर्किसन.
हेही वाचा - ३६ वर्षांपूर्वी रवी शास्त्रींनी 'या' किताबासोबत जिंकली होती नवी कार!
हेही वाचा - इंग्लंडच्या माजी वेगवान गोलंदाजाचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन