मुंबई - भारतीय संघाने २०१९ वर्षाचा शेवट विजयाने केला. वर्षाअखेरीस भारतीय संघाने वेस्ट इंडीज विरुद्धची टी-२० आणि एकदिवसीय मालिका जिंकली. आता २०२० या नवीन वर्षाची सुरुवात विजयाने करण्यासाठी भारतीय संघ उत्सुक आहे.
भारतीय संघ जानेवारी महिन्यात तीन संघासोबत सामने खेळणार आहे. यात श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या दिग्गज संघाचा समावेश आहे. वाचा भारतीय संघाचे जानेवारी महिन्यातील वेळापत्रक....
श्रीलंकेविरुद्ध मालिका
- ०५ जानेवारी : पहिला टी-२० सामना (गुवाहाटी)
- ०७ जानेवारी : दुसरा टी-२० सामना (इंदूर)
- ०९ जानेवारी : तिसरा टी-२० सामना (पुणे)
श्रीलंकेविरुद्ध टी-20 सामन्यानंतर भारतीय संघ ऑस्ट्रेलियाविरोधात एकदिवसीय सामने खेळणार आहे. हे सामने मुंबई, राजकोट आणि बंगळुरू येथे होणार आहेत.
ऑस्ट्रेलिया एकदिवसीय दौरा -
- १४ जानेवारी : पहिला एकदिवसीय सामना (मुंबई)
- १७ जानेवारी : दुसरा एकदिवसीय सामना (राजकोट)
- १९ जानेवारी : तिसरा एकदिवसीय सामना (बंगळुरू)
त्यानंतर भारतीय संघ २०२० मध्ये पहिला परदेश दौरा न्यूझीलंड विरोधात करणार आहे.
न्यूझीलंडविरुद्ध टी-२०
- २४ जानेवारी : पहिला टी-२० सामना (ऑकलंड)
- २६ जानेवारी : दुसरा टी-२० सामना (ऑकलंड)
- २९ जानेवारी : तिसरा टी-२० सामना (ऑकलंड)
- ३१ जानेवारी : चौथा टी-२० सामना (ऑकलंड)
हेही वाचा - शेवटी विराटच ठरला दशकातील सर्वोत्तम क्रिकेटपटू
हेही वाचा - मुंबई-रेल्वे सामन्यात गोलंदाजांची धमाल, पहिल्याच दिवशी १५ फलंदाज बाद