ETV Bharat / sports

सय्यद मुश्ताक अली चषक : प्रियम गर्गकडे उत्तर प्रदेशचे कर्णधारपद

कोरोना संसर्गाची स्थिती पाहता, सात खेळाडूंनादेखील राखीव ठेवण्यात आले असून दोन यष्टीरक्षकांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. यावेळी संघाची कमान प्रियम गर्गकडे आहेत. यूपीच्या संघात यावेळी अनेक बदल झाले आहेत. त्याअंतर्गत पुन्हा एकदा ज्ञानेंद्र पांडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे.

syed-mushtaq-ali-up-team-announced-for-t20-cricket
सय्यद मुश्ताक अली चषक : प्रियम गर्गकडे उत्तर प्रदेशचे कर्णधारपद
author img

By

Published : Jan 2, 2021, 8:38 AM IST

लखनऊ - १० जानेवारीपासून रंगणाऱ्या सय्यद मुश्ताक अली टी-२० चषक स्पर्धेसाठी उत्तर प्रदेश (यूपी) संघाची शुक्रवारी घोषणा करण्यात आली. अनुभवी फलंदाज सुरेश रैनासह वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारला संघात संधी देण्यात आली आहे. उत्तर प्रदेश क्रिकेट असोसिएशन (यूपीसीए) चे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शर्मा यांनी शुक्रवारी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली.

प्रियम गर्ग कर्णधार -

कोरोना संसर्गाची स्थिती पाहता, सात खेळाडूंनादेखील राखीव ठेवण्यात आले असून दोन यष्टीरक्षकांनाही संघात स्थान देण्यात आले आहे. यावेळी संघाची कमान प्रियम गर्गकडे आहेत. यूपीच्या संघात यावेळी अनेक बदल झाले आहेत. त्याअंतर्गत पुन्हा एकदा ज्ञानेंद्र पांडे यांना जबाबदारी देण्यात आली आहे. दुखापतीमुळे आयपीएलबाहेर पडलेला भुवनेश्वर कुमार सय्यद मुश्ताक अली टी -२० स्पर्धेतून मैदानात परतणार आहे. जम्मू-काश्मीर, कर्नाटक, पंजाब, रेल्वे आणि त्रिपुरासह उत्तर प्रदेश संघ अ गटात आहे.

हेही वाचा - उमेश यादवच्या बदली टी. नटराजनला कसोटी संघात स्थान

यूपीसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक शर्मा म्हणाले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला सुरेश रैनाही यूपीचे प्रतिनिधित्व करेल. तर कर्ण शर्मा उपकर्णधार म्हणून काम पाहिल. पंजाबविरुद्ध बंगळुरू येथे १० जानेवारीपासून उत्तर प्रदेशचा संघ आपल्या मोहिमेला सुरुवात करेल.

संघ -

प्रियाम गर्ग (कर्णधार), कर्ण शर्मा (उपकर्णधार), सुरेश रैना, भुवनेश्वर कुमार, रिंकू सिंह, माधव कौशिक, समर्थ सिंह, शुभम चौबे, ध्रुव चंद जुरेल (यष्टीरक्षक), आर्यन जुयाल (यष्टीरक्षक), अंकित राजपूत, मोहसीन खान, शिवम मावी, शिवा सिंग आणि शानू सैनी. राखीव म्हणून, अकीब खान, समीर चौधरी, मोहित जांग्रा, हरदीप सिंग, अभिषेक गोस्वामी, नलिन मिश्रा आणि पूर्णक त्यागी.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.