नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) देशांतर्गत क्रिकेट हंगामाची सुरुवात सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेपासून होणार आहे. या स्पर्धेचे सामने १० ते ३१ जानेवारी दरम्यान सहा राज्यात खेळवले जातील. जैव सुरक्षित वातावरणात (बायो बबल) ही स्पर्धा पार पडेल.
हेही वाचा - भारताच्या फलंदाजांची भंबेरी उडवण्यासाठी 'हा' गोलंदाज संघात होणार दाखल
सहभागी संघाला २ जानेवारी रोजी आपापल्या संबंधित बायो बबलमध्ये दाखल व्हावे लागेल. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी सर्व राज्य क्रिकेट मंडळांना यांसंबधी ई-मेलद्वारे कळवले आहे. कोरोनामुळे भारतातील क्रिकेटचे वेळापकत्रक कोलमडले आहे.
आगामी आयपीएलमध्ये एक किंवा दोन संघ वाढणार आहेत. या स्पर्धेचा लिलाव फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. त्यामुळे सय्यद मुश्ताक अली स्पर्धा आधी खेळवण्यात येणार आहे. मात्र, रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेला कधी प्रारंभ होणार याबाबत मात्र बीसीसीआयने स्पष्टीकरण दिलेले नाही.