मुंबई - वेस्ट इंडीजचा स्टार खेळाडू आणि आयपीएलमधील कोलकाता नाइट रायडर्स संघाचा सदस्य सुनील नरेनने एक आनंदाची गोड बातमी दिली आहे. नरेनच्या घरात एका तान्ह्या बाळाचे आगमन झाले आहे. सोमवारी (०१ फेब्रुवारी) त्याची पत्नी एंजेलिना हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.
सुनील नरेनने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटद्वारे आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. यात त्याने आपल्या मुलाचे छायाचित्रे देखील पोस्ट केले आहे.
नरेनने आपल्या लहान मुलाचा फोटो शेअर करत लिहले आहे की, 'तू माझ्या हृदयातील ती जागा भरून काढली आहे. तुझ्या चेहऱ्यावर आम्ही, देवाची कृपा आणि दया पाहिली आहे. आमचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.'
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
दरम्यान, नरेनच्या आधी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली व अभिनेत्री अनुष्का शर्मा यांच्या घरात चिमुकल्या पाहुणीचे आगमन झाले. अनुष्काने ११ जानेवारीला दुपारी एका गोंडस मुलीला जन्म दिला. त्यानंतर काही दिवसांनी विरूष्का जोडीने आपल्या मुलीचं बारसं करून तिचे नाव वमिका ठेवल्याचे जाहीर केले आहे.
हेही वाचा - गुड न्यूज : टीम इंडियाचा स्टार फलंदाज दुखापतीतून सावरला, इंग्लंडविरुद्ध खेळणार
हेही वाचा - तब्बल १२ वर्षानंतर 'या' आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूला खेळायचंय आयपीएल!