लंडन - उद्यापासून अॅशेसच्या चौथ्या कसोटी सामन्याला सुरुवात आहे. तत्पूर्वी ऑस्ट्रेलिया संघाला आनंदाची बातमी मिळाली असून संघात मोठे बदल घडून आले आहेत. दुखापतीमुळे संघाबाहेर गेलेला स्टीव स्मिथ आणि वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क यांचे संघात पुनरागमन झाले आहे.
हेही वाचा - यशस्वी कर्णधार ठरल्यावर विराट पहिल्यांदा काय म्हणाला पाहा...
मँचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ट मैदानावर हा सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी कांगांरुनी आपल्या १२ सदस्यीस संघाची घोषणा केली. या संघातून डावखुरा फलंदाज उस्मान ख्वाजाला वगळण्यात आले आहे. मागच्या तीन सामन्यामध्ये ख्वाजाला चांगले प्रदर्शन करता आले नव्हते. त्याने सहा डावांत मिळून १२२ धावा केल्या आहेत. ख्वाजासोबत जेस्म पॅटिन्सनला देखील आराम देण्यात आला आहे.
-
Fascinating read on Steve Smith's prep as he readies himself for his Test return. Langer, Broad with some great insights | @ARamseyCricket: https://t.co/cfz1gZCWLT #Ashes pic.twitter.com/zzMls832KY
— cricket.com.au (@cricketcomau) September 2, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Fascinating read on Steve Smith's prep as he readies himself for his Test return. Langer, Broad with some great insights | @ARamseyCricket: https://t.co/cfz1gZCWLT #Ashes pic.twitter.com/zzMls832KY
— cricket.com.au (@cricketcomau) September 2, 2019Fascinating read on Steve Smith's prep as he readies himself for his Test return. Langer, Broad with some great insights | @ARamseyCricket: https://t.co/cfz1gZCWLT #Ashes pic.twitter.com/zzMls832KY
— cricket.com.au (@cricketcomau) September 2, 2019
स्मिथला झाली होती दुखापत -
लॉर्ड्सवर झालेल्या अॅशेसच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव स्मिथला जोफ्रा आर्चरचा वेगवान चेंडू लागला. मानेवर आदळलेल्या या चेंडूने स्मिथ जमिनीवर कोसळला. त्यानंतर त्याला रिटायर्ड हर्ट होऊन मैदानाबाहेर जावे लागले. काही वेळानंतर स्मिथ पुन्हा मैदानात उतरला. त्याने आणखी ९ चेंडूत १२ धावांची भर घालत तो व्यक्तिगत ९२ धावांवर बाद झाला. दुखापतग्रस्त स्मिथच्या बदली मार्कस लाबुशेनला संघात सामिल करण्यात आले होते.
अॅशेसच्या पहिल्या दोन सामन्यात त्याने धडाकेबाज फलंदाजीचे प्रदर्शन केले होते. या मालिकेतील पहिल्या सामन्यात स्मिथने दोनही डावात शतके ठोकली होती. शिवाय, दुसऱ्या सामन्यातही त्याने ९२ धावांची खेळी केली. या कामगिरीमुळे स्मिथने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रमवारीतील फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले.
ऑस्ट्रेलियाचा संघ -
- डेव्हिड वॉर्नर, स्टीव स्मिथ, टिम पेन(कर्णधार), ट्रेविस हेड, मार्कस हॅरिस, मॅथ्यू वेड, मार्नस लाबुशेन, मिचेल स्टार्क, पीटर सिडल, नॅथन लायन, जोश हेजलवुड और पॅट कमिन्स