कोलंबो - पहिल्या सामन्यात मालिंगाला विजयी निरोप दिल्यानंतर दुसऱ्या सामन्यातही लंकेने विजय मिळवला. तीन सामन्याच्या मालिकेत २-० ने आघाडी घेत तब्बल ४४ महिन्यानंतर श्रीलंकेने मालिका विजय साकारला आहे.
बांगलादेशने दिलेले २३९ धावांचे आव्हान श्रीलंकेने तीन गड्यांच्या मोबदल्यात पूर्ण केले. यजमान लंकेकडून अविष्का फर्नांडोने ८२, मॅथ्यूजने ५२, कर्णधार दिमुत करुणारत्नेने १५ तर कुशल परेराने ३० धावा केल्या. बांगलादेशकडून मुस्तफिजुर रेहमान आणि मेहदी हसन यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
-
And that's a wrap, Sri Lanka do it in style and win the series 2-0 with 1-match to go!
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Sri Lanka 242/3 (44.4 ov, Avishka Fernando 82, Angelo Mathews 52*, Kusal Mendis 41*, Kusal Perera 30) v BAN 238/8 #SLvBAN pic.twitter.com/8NPB2GcYoD
">And that's a wrap, Sri Lanka do it in style and win the series 2-0 with 1-match to go!
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 28, 2019
Sri Lanka 242/3 (44.4 ov, Avishka Fernando 82, Angelo Mathews 52*, Kusal Mendis 41*, Kusal Perera 30) v BAN 238/8 #SLvBAN pic.twitter.com/8NPB2GcYoDAnd that's a wrap, Sri Lanka do it in style and win the series 2-0 with 1-match to go!
— Sri Lanka Cricket 🇱🇰 (@OfficialSLC) July 28, 2019
Sri Lanka 242/3 (44.4 ov, Avishka Fernando 82, Angelo Mathews 52*, Kusal Mendis 41*, Kusal Perera 30) v BAN 238/8 #SLvBAN pic.twitter.com/8NPB2GcYoD
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. बांगलादेशचा यष्टीरक्षक फलंदाज मुशफिकुर रहिमने ९८ धावा जोडल्या. त्याच्या योगदानाच्या जोरावर आठ विकेट्सच्या मोबदल्यात २३८ धावा ठेवल्या. लंकेकडून नुवान प्रदीप, इसुरु उदाना आणि अकिला धनंजय यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. श्रीलंकेच्या अविष्का फर्नांडोला सामनावीराच्या पुरस्काराने गौरवण्यात आले.