ETV Bharat / sports

आयपीएलपूर्वी 'या' टी-20 लीगला होणार सुरूवात

author img

By

Published : Jul 29, 2020, 6:57 PM IST

श्रीलंकेच्या 4 स्टेडियमवर होणाऱ्या या लीगमध्ये एकूण 23 सामने खेळले जातील. या लीगमध्ये भाग घेणार्‍या पाच संघांची नावे कोलंबो, केन्डी, गाले, डम्बुला आणि जाफना या शहरांच्या नावावरून असणार आहेत. श्रीलंकेत प्रथमच खेळल्या जाणाऱ्या या टी-20 क्रिकेटमध्ये 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भाग घेतील.

Sri Lanka Premier League to start on august 28
आयपीएलपूर्वी 'या' टी-20 लीगला होणार सुरूवात

नवी दिल्ली - श्रीलंका प्रीमियर लीग टी-20 स्पर्धेचा पहिला हंगाम 28 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. तर, या हंगामाचा अंतिम सामना 20 सप्टेंबरला खेळवण्यात येईल. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली.

श्रीलंकेच्या 4 स्टेडियमवर होणाऱ्या या लीगमध्ये एकूण 23 सामने खेळले जातील. या लीगमध्ये भाग घेणार्‍या पाच संघांची नावे कोलंबो, केन्डी, गाले, डम्बुला आणि जाफना या शहरांच्या नावावरून असणार आहेत. श्रीलंकेत प्रथमच खेळल्या जाणाऱ्या या टी-20 क्रिकेटमध्ये 70 हून अधिक आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भाग घेतील.

श्रीलंकेचे क्रिकेट सचिव एश्ले डिसिल्वा म्हणाले की, "इतर देशांच्या तुलनेत श्रीलंकेने कोरोना विषाणूपासून बचाव करण्याचे चांगले कार्य केले आहे आणि म्हणूनच या लीगमध्ये विदेशी खेळाडू सहभागी होण्यास रस दर्शवत आहेत. सध्या आम्ही स्पर्धेतील 23 सामने खेळवण्याच्या विचारात आहोत, पण जर भारत खेळायला तयार झाला तर कदाचित आम्ही केवळ 13 सामने आयोजित करू." 30 जुलै रोजी या लीगसाठी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला जाईल.

कोरोनामुळे स्थगित झालेले क्रिकेट हळूहळू सुरू होत आहे. इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यातील कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन झाले आहे. दरम्यान, बीसीसीआयनेही युएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसीच्या बैठकीत टी-20 वर्ल्डकप पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आयपीएलचा मार्ग मोकळा झाला. कॅरेबियन प्रीमियर लीग (सीपीएल) 2020 चेही वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा 18 ऑगस्टपासून सुरू होईल, तर अंतिम सामना 10 सप्टेंबरला खेळला जाईल. लीगचे सर्व 33 सामने त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे दोन स्टेडियममध्ये खेळले जातील.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.