नवी दिल्ली - भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये सोमवारी रात्री झटापट झाली. यामध्ये भारताच्या 20 जवानांना वीरमरण आले. तसेच चीनची देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली. चीनचे 40 पेक्षा जास्त सैनिक ठार झाल्याचे सांगितले जात आहे. या संघर्षात वीरमरण आलेल्या भारतीय जवानांना क्रीडाविश्वाने श्रद्धांजली वाहिली. यात भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा, सायना नेहवाल, साक्षी मलिक, अशा दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे.
काय घडलं भारत-चीन सीमेवर -
चीन सीमेवर-सोमवारी चीनच्या सैन्याने लाईन ऑफ अॅक्च्युअल कंट्रोल (एलएसी) च्या आपल्या बाजूला काही तात्पुरत्या निशाण्या उभ्या केल्या. त्यानंतर आपल्या सैनिकांनी त्या निशाण्या खाली उतरवल्या. सुरुवातीला चीनचे सैनिक मागे हटले, मात्र त्यानंतर ते जवळपास हजार सैनिक घेऊन परत आले. भारताचेही सुमारे हजार सैनिक तिथे होते, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर हिंसक झटपट झाली. नदीच्या किनारी भागामध्ये ही झटपट सुरू असल्यामुळे कित्येक सैनिक नदीमध्ये पडले.