केपटाऊन - यजमान संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना रविवारपर्यंत पुढे ठकलण्यात आला आहे. गुरुवारी अखेरच्या फेरीत संघांची चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये एका खेळाडूला कोरोना असल्याचे उघड झाले.
हेही वाचा - फिरकीपटू मुजीब-उर-रहमानला कोरोना
सामना पुढे ढकलण्याचा निर्णय इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) आणि यजमान बोर्ड क्रिकेट दक्षिण आफ्रिका (सीएसए) च्या सहमतीने घेण्यात आला."दक्षिण आफ्रिका संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून, दोन्ही संघ, सीएसएचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुगंद्री गावंडेरे तसेच ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टॉम हॅरिसन यांनी हा सामना रविवारपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेतला आहे'', असे दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेट मंडळाने म्हटले आहे.
उभय संघात पहिला सामना ६ डिसेंबरला, तर दुसरा सामना ७ आणि तिसरा सामना ९ डिसेंबर रोजी खेळला जाईल.