लखनौ - दक्षिण आफ्रिका आणि भारतीय महिला यांच्यात आज दुसरा टी-२० सामना लखनौच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियममध्ये खेळला जात आहे. या सामन्यात आफ्रिका संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर भारतीय संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे.
पाहुण्या संघाने शनिवारी झालेल्या सामन्यात भारतावर ८ गडी राखून विजय मिळवला. या विजयासह ते ३ सामन्याच्या मालिकेत १-० ने आघाडीवर आहेत.
कर्णधार हरमनप्रीत बाहेर -
भारतीय संघाची नियमित कर्णधार हरमनप्रीत कौर हिला दुखापत झाली आहे. यामुळे तिने या सामन्यातून देखील माघार घेतली आहे. तिने पहिले सामनाही खेळलेला नव्हता. हरमनप्रीतच्या जागेवर स्मृती मानधाना भारतीय संघाचे नेतृत्व करत आहे.
भारत महिला क्रिकेट संघ -
स्मृती मानधाना (कर्णधार), शेफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, हरलीन देओल, नुजहत परवीन (यष्टीरक्षक), सिमरन बहादुर, राधा यादव, राजेश्वरी गायकवाड आणि अरुंधति रेड्डी.
दक्षिण अफ्रिकेचा महिला क्रिकेट संघ -
लिजेल ली, ऐनी बॉश, सुने लुस (कर्णधार), लॉरा वोल्वार्डट, मिग्नोन डु प्रीज, लारा गुडॉल, नादिन डी किर्कल, सुनालो जाफ्टा (यष्टीरक्षक), शबनीम इस्माइल, अयाबोंगा खाका आणि नोंकुल्लेको म्लाबा.
हेही वाचा - IND vs ENG : मालिका विजयानंतर भारतीय संघाला बसला फटका, विराटने केली चूक मान्य
हेही वाचा - IPL २०२१ : गोलंदाजांसाठी धोक्याची घंटा, धोनीचा ११४ मीटर लांब षटकार