पुणे - दक्षिण आफ्रिकेविरुध्दचा पहिला कसोटी सामना भारतीय संघाने २०३ धावांनी जिंकत ३ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने या सामन्यात फलंदाजीसह गोलंदाजीतही चांगली कामगिरी केली. या विजयासह भारतीय संघाने आयसीसी कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आपले अव्वल स्थान बळकट केले.
आफ्रिकेविरुध्दच्या मालिकेतील दुसरा सामना १० ऑक्टोबरपासून पुण्याच्या गहुंजे मैदानात रंगणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघ पुण्याला पोहोचले. तेव्हा आपल्या लाडक्या खेळाडूंना पाहण्यासाठी चाहत्यांनी विमानतळाबाहेर मोठी गर्दी केली होती.
हेही वाचा - अजिंक्य रहाणेने शेअर केला नन्ही परीसोबतचा 'क्युट' फोटो, पाहाच एकदा
दरम्यान, दुसरा सामना जिंकून भारतीय संघ मालिकेत विजयी आघाडी घेण्यासाठी इच्छुक असणार आहे. तर आफ्रिकेचा संघ मालिकेत बरोबरी साधण्याच्या प्रयत्नात असेल. यामुळे हा सामना रंगतदार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा - ऑस्ट्रेलियाची सुंदर खेळाडू एलिस पॅरीचा विक्रम, पुरुष आणि महिलांमध्ये ठरली पहिली