जोहान्सबर्ग - दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज व्हर्नान फिलँडरने इंग्लंडविरुद्ध अखेरचा कसोटी सामना खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले आहे. फिलँडरने या सामन्यापूर्वी आपल्या देशासाठी ९७ सामने खेळले असून यात त्याने २६१ बळी घेतले आहेत. त्याने २०११ मध्ये पदार्पण केले होते. या सामन्यात इंग्लंडने यजमानांना ११९ धावांनी पराभूत केले.
-
We are not crying, you are! 🤧@VDP_24 in his own words...#ThankYouBigVern #ProteaFire pic.twitter.com/Hc4XvDL6c9
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">We are not crying, you are! 🤧@VDP_24 in his own words...#ThankYouBigVern #ProteaFire pic.twitter.com/Hc4XvDL6c9
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 27, 2020We are not crying, you are! 🤧@VDP_24 in his own words...#ThankYouBigVern #ProteaFire pic.twitter.com/Hc4XvDL6c9
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 27, 2020
हेही वाचा - IPL २०२० : ठरलं तर.. फायनलचा थरार रंगणार मुंबईत.. ही आहे तारीख
इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या सामन्यात फिलँडरने पहिल्या डावात दोन विकेट घेतल्या. दुसऱ्या डावात त्याला एकही विकेट मिळाली नाही. या डावात दीड षटक टाकल्यानंतर त्याला दुखापतीमुळे बाहेर जावे लागले. सामन्यानंतर फिलँडरला खास टोकन देण्यात आले.
-
Class 👏@VDP_24 receives his guard of honour 👏#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/tEYy7OSGv9
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Class 👏@VDP_24 receives his guard of honour 👏#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/tEYy7OSGv9
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 27, 2020Class 👏@VDP_24 receives his guard of honour 👏#ProteaFire #SAvENG pic.twitter.com/tEYy7OSGv9
— Cricket South Africa (@OfficialCSA) January 27, 2020
'फिलँडरच्या योगदानाबद्दल मला त्याचे आभार मानायचे आहेत. हा संघ त्याची आठवण काढेल. आम्ही रात्री त्याच्याबरोबर ड्रेसिंग रूममध्ये बसू आणि आठवणींना उजाळा देऊ', असे दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने म्हटले आहे.
तत्पूर्वी, फिलँडरला त्याच्या शेवटच्या कसोटी सामन्यात आयसीसीने दंड आकारला. वँडर्स स्टेडियमवर इंग्लंडविरूद्ध झालेल्या चौथ्या कसोटीत फिलँडरने फलंदाज जॉस बटलरला बाद केल्यानंतर चूकीचे वर्तन केले होते. या घटनेबद्दल फिलँडरच्या खात्यात डिमेरिट गुणही जोडण्यात आला होता.