पुणे - आफ्रिकेविरूद्ध गहुंजे येथे रंगलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने आपली पकड मजबूत केली आहे. या कसोटीच्या चौथ्या दिवशी भारताने आफ्रिकेवर फॉलोऑन लादला. त्यामुळे तब्बल ११ वर्षांनी आफ्रिका संघासोबत एक मोठी गोष्ट घडली आहे.
हेही वाचा - १४ वर्षाचा ग्रँडमास्टर प्रग्गनानंधा जगज्जेता, अंडर-१८ स्पर्धेचे पटकावले जेतेपद
आफ्रिकेला ११ वर्षांनंतर प्रथमच एखाद्या संघाने फॉलोऑन दिला आहे. यापूर्वी २००८ मध्ये रंगलेल्या लॉर्ड्स कसोटीत इंग्लंडने फॉलोऑन दिला होता. पण आफ्रिकेने सामन्यात हार मानली नाही. दिग्गज फलंदाज ग्रॅमी स्मिथ, नेल मॅकेंझी आणि हाशिम अमला यांनी खिंड लढवत हा सामना अनिर्णीत राखला होता.
-
#TeamIndia enforce the follow-on and its wicket in the 1st over courtesy @ImIshant #INDvSA @Paytm pic.twitter.com/YvqcVL0TPL
— BCCI (@BCCI) October 13, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">#TeamIndia enforce the follow-on and its wicket in the 1st over courtesy @ImIshant #INDvSA @Paytm pic.twitter.com/YvqcVL0TPL
— BCCI (@BCCI) October 13, 2019#TeamIndia enforce the follow-on and its wicket in the 1st over courtesy @ImIshant #INDvSA @Paytm pic.twitter.com/YvqcVL0TPL
— BCCI (@BCCI) October 13, 2019
कोहलीला आतापर्यंत १४ वेळा फॉलोऑन देण्याची संधी मिळाली आणि त्यात त्यानं ७ वेळा फॉलोऑन दिला. त्यापैकी चार सामने जिंकले आणि दोन सामने पावसामुळे अनिर्णीत राहिले. पण, कोहलीने आज आफ्रिकेला फॉलोऑन देऊन नवा विक्रम नोंदवला. तत्पूर्वी, कर्णधार विराट कोहलीची द्विशतकी, आणि मयांक अग्रवालची शतकी खेळींच्या जोरावर भारताने दुसऱ्या कसोटीत ६०१ धावांवर आपला पहिला डाव घोषित केला.