कोलकाता - भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली २३ ऑक्टोबरला बीसीसीआयच्या अध्यक्षपदाचा कारभार हाती घेणार आहे. अध्यक्षपदाची घोषणेनंतर मंगळवारी गांगुली मुंबईतून बंगालमध्ये परतला. बंगालमध्ये गांगुलीचे शानदार स्वागत करण्यात आले. यादरम्यान, गांगुलीने 'ईटीव्ही भारत'शी बातचित केली.
या बातचित दरम्यान गांगुलीने सांगितले की, 'सौरव गांगुली असल्याने जास्त आपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत. या आपेक्षा पूर्ण करण्यासाठी मी सर्वोतोपरी प्रयत्न करेन.' तसेच त्याने प्रथम श्रेणी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट दोनही प्रकाराकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले.
गांगुलीने पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविषयी भाष्य केले. ममतांविषयी गांगुली म्हणाला, 'त्या खूप चांगल्या व्यक्ती आहेत. इतरांसाठी त्या मुख्यमंत्री असल्या तरी ते माझ्यासाठी त्यापेक्षा जास्त आहेत. प्रत्यक्षात त्या माझी 'दीदी' असून मी त्यांच्यापासून प्रेरणा घेतो.
दरम्यान, गांगुली २३ ऑक्टोबरला पदभार स्वीकारणार आहे. यानंतर २४ तारखेला बांगलादेश विरुध्दच्या मालिकेसाठी निवड समितीच्या बैठकीला तो हजर असणार आहे.
हेही वाचा - सॅल्युट विरू तुझ्या कामाला..! पुलवामा हल्ल्यातील हुतात्मा जवानांच्या मुलांना शिकवतोय क्रिकेट
हेही वाचा - #HBD KALLIS : ...'या' कारणामुळे जॅक कॅलिस ६५ नंबरची जर्सी घालत होता