मुंबई - भारतीय संघाचा मध्यमगती गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीतून सावरला असून त्याने सरावाला सुरूवात केली आहे. शमीने गोलंदाजी करतानाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
मोहम्मद शमीला ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील अॅडलेड येथे खेळवण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात दुखापत झाली होती. यामुळे त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या उर्वरित तीनही कसोटी मालिकेतून माघार घ्यावी लागली.
शमीच्या मनगटाला दुखापत झाली होती. त्यानंतर त्याच्यावर बंगळुरूतील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये उपचार सुरू होते. शमी आता दुखापतीतून सावरला असून त्याने अकादमीमध्ये सरावाला सुरूवात केली आहे.
-
Always focus on how far you’ve come ,rather than how far you have left to go 💪🏻💪🏻 #TeamIndia #mshami11 pic.twitter.com/rXGOe9JYo3
— Mohammad Shami (@MdShami11) February 5, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Always focus on how far you’ve come ,rather than how far you have left to go 💪🏻💪🏻 #TeamIndia #mshami11 pic.twitter.com/rXGOe9JYo3
— Mohammad Shami (@MdShami11) February 5, 2021Always focus on how far you’ve come ,rather than how far you have left to go 💪🏻💪🏻 #TeamIndia #mshami11 pic.twitter.com/rXGOe9JYo3
— Mohammad Shami (@MdShami11) February 5, 2021
शमी दुखापतीमुळे ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरोधातील पहिल्या दोन कसोटी सामन्यातून बाहेर होता. आता तो तंदुरुस्त झाला असून त्याने सरावाला सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार शमी इंग्लंडविरोधातील कसोटी मालिकेच्या अखेरच्या दोन कसोटी सामन्यासाठी उपलब्ध असणार आहे.
हेही वाचा - स्टीव्ह स्मिथ ठरला ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम क्रिकेटपटू
हेही वाचा - IND vs ENG : आर्चरचे भारताला दणके, दोन्ही सलामीवीर माघारी