ढाका - बांगलादेश क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शादमान इस्लामला कोरोनाची लागण झाली आहे. एका क्रीडा संकेतस्थळाने या संदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, शादमान देशाअंतर्गत होत असलेल्या प्रथम श्रेणी स्पर्धेतील सुरूवातीचे काही सामन्यांना मुकणार आहे.
शादमान याने एका क्रीडा संकेतस्थळाला बोलताना सांगितलं की, 'मी सद्यघडीला एका हॉटेलमध्ये क्वारंटाइन असून तिसऱ्या कोरोना रिपोर्टची मी वाट पाहत आहे. जर हा रिपोर्ट निगेटिव्ह आला तर मी खेळू शकेन.'
याआधी बांगलादेशचा कसोटी संघाचा कर्णधार मोमिनुल हकला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पुढे काही दिवसांनंतर त्याचा रिपोर्ट निगेटिव्ह आला.
बांगलादेशचा संघ श्रीलंकेविरुद्ध दोन सामन्याची कसोटी मालिका खेळणार आहे. उभय संघातील या मालिकेला २१ एप्रिलपासून सुरूवात होणार आहे. यामुळे बांगलादेशच्या खेळाडूंना एनसीएलमध्ये भाग घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
बांगलादेशचा संघ १२ एप्रिलला श्रीलंकेत दाखल होणार आहे. यानंतर पलेकेले इंटरनॅशनल स्टेडियमध्ये उभय संघातील मालिका खेळवली जाणार आहे.
हेही वाचा - सचिनच्या इंडिया लिजेड्ने जिंकली रोड सेफ्टी वर्ल्ड स्पर्धा, साराने केलं हटके सेलिब्रेशन
हेही वाचा - जोफ्रा आर्चर IPL मधून बाहेर पडल्यास.., 'या' ३ गोलंदाजांवर असेल राजस्थानची नजर