मुंबई - कोरोना विषाणूचा देशात वाऱ्यासारखा होत असलेला प्रसार पाहून महाराष्ट्राबरोबर भारतातील अन्य राज्यांमध्येही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले नाही तर तुरुंगवास भोगावा लागू शकतो, असा इशारा भाजपाचा खासदार आणि भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने दिला आहे.
गंभीरने यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात तो म्हणतो, 'संपूर्ण समाजासाठी तुम्ही धोका बनू नका. घरातच राहा. युद्ध नोकरी किंवा व्यापाराबरोबर नाही तर आयुष्याबरोबर आहे. ज्या व्यक्ती अत्यावश्यक सेवा देत आहेत त्यांना अडचण निर्माण होईल, असे कोणतेही काम तुम्ही करू नका. आता तुम्हाला एकांतावासामध्ये जायचे आहे की जेलमध्ये हे तुम्हीच ठरवा. नियमांचे पालन करा. जय हिंद.'
-
खुद भी जाएँगे और परिवार को भी ले जाएँगे !
— Gautam Gambhir (@GautamGambhir) March 23, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Quarantine या जेल !
पूरे समाज पर ख़तरा ना बने और घर पर रहें ! जंग नौकरी और व्यापार से नहीं, ज़िंदगी से है ! ज़रूरी सेवायें देने वाले परेशान ना हों इसका भी ध्यान रखें !
LOCKDOWN !!!! का पालन करें
जय हिंद 🇮🇳
">खुद भी जाएँगे और परिवार को भी ले जाएँगे !
— Gautam Gambhir (@GautamGambhir) March 23, 2020
Quarantine या जेल !
पूरे समाज पर ख़तरा ना बने और घर पर रहें ! जंग नौकरी और व्यापार से नहीं, ज़िंदगी से है ! ज़रूरी सेवायें देने वाले परेशान ना हों इसका भी ध्यान रखें !
LOCKDOWN !!!! का पालन करें
जय हिंद 🇮🇳खुद भी जाएँगे और परिवार को भी ले जाएँगे !
— Gautam Gambhir (@GautamGambhir) March 23, 2020
Quarantine या जेल !
पूरे समाज पर ख़तरा ना बने और घर पर रहें ! जंग नौकरी और व्यापार से नहीं, ज़िंदगी से है ! ज़रूरी सेवायें देने वाले परेशान ना हों इसका भी ध्यान रखें !
LOCKDOWN !!!! का पालन करें
जय हिंद 🇮🇳
दरम्यान, रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूचे आवाहन करताना, अत्यावश्यक सेवा देणाऱ्या व्यक्तींसाठी सायंकाळी पाच वाजता टाळी किंवा थाळी नाद करा, असे मोदींनी सांगितलं होतं. पण, देशातील काही लोकांनी मात्र सायंकाळी पाच वाजता रस्त्यावर उतरून त्यावर पाणी फेरले. यामुळे महाराष्ट्र, पंजाब आणि दिल्लीमध्ये संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
कोरोना विषाणूच्या रुग्णांमध्ये दिवसागणिक वाढ होत आहे. देशात हा आकडा ४०० पार पोहचला आहे तर महाराष्ट्रात ९७ कोरोनाचे रुग्ण आहेत. कोरोनाचा प्रसार पाहता, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा -"माझी तुलना बाबर आझमशी करा विराटशी नको"
हेही वाचा - जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज कोण?...विंडीजच्या चंद्रपॉलने दिलं 'हे' उत्तर